नागपंचमीनिमित्त वेळापुरात झालेल्या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दहीहंडीला महिलांचा उत्साह शिगेला
अकलूज (बारामती झटका)
श्री महादेव देवस्थान देवालय ट्रस्ट वेळापूर यांचे वतीने नागपंचमीनिमित्त सालाबादप्रमाणे आयोजित केलेल्या विविध स्पर्धांना मुली महिलातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामधील विजेत्यांना पैठणी साडीसह विविध बक्षीसे देण्यात आली.
नागपंचमी सण म्हणजे महिलांच्या आनंदाला द्विगुणित करणारा सण आणि याच सणाचे औचित्य साधून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने श्री महादेव देवस्थान देवालय ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शशिकांत तेरखेडकर सर, हरिभाऊ माने सर यांचे शुभहस्ते श्री अर्धनारी नटेश्वर, श्री स्वामी समर्थ व परमपूज्य डॉ. भाईनाथ महाराज तसेच दिवंगत संस्थापक, पाच ट्रस्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी कै. लोकनेते सूर्यकांत माने देशमुख यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती शिलप्रभादेवी सूर्यकांत माने देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तर याप्रसंगी श्रीमती सरोजिनी सुभाष कुलकर्णी, श्रीमती जयश्री विलासराव माने देशमुख, श्रीमती आशा टिंगरे, श्रीमती अर्चना अमोल कुलकर्णी आदी मान्यवर महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करुणा धुमाळ देशमुख या होत्या.

अतिशय उत्साही वातावरणात रांगोळी, मेहंदी, संगीत खुर्ची, उखाणे, फनी गेम, बकेट बॉल गेम अशा विविध स्पर्धा पार पडल्या. मेहंदी स्पर्धेमध्ये पाचवी ते नववी या गटामध्ये शिवानी संजय माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक वैष्णवी हरिदास कुंभार व तृतीय क्रमांक ईश्वरी संजय उरणे यांनी पटकाविला. दहावी ते कॉलेज गटामध्ये आरती प्रभाकर माने यांनी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक सोनाली महादेव साठे व तृतीय क्रमांक प्रियाणी अभिजीत जोशी यांनी पटकाविला तर विवाहित गटामध्ये सोनाली चैतन्य माने यांनी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक आरिफ सलीम तांबोळी व तृतीय क्रमांक शिवानी राजवैभव सुतार यांनी पटकाविला.
संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये पहिली ते चौथी यामध्ये अविरा अरुण सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर श्रुती नितीन कदम यांनी द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक आरोही सिद्धेश्वर गालफाडे यांनी पटकाविला. पाचवी ते कॉलेज गट यामध्ये यज्ञा अजित कदम यांनी प्रथम क्रमांक तर सायली बळीराम जाधव यांनी द्वितीय क्रमांक व शिवानी संजय माने यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तर महिला गटांमध्ये डॉक्टर गौरी देवेंद्र गायकवाड यांनी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक चांदणी अनिल घाडगे व तृतीय क्रमांक वैशाली किशोर मेहेर यांनी पटकाविला.

वेशभूषा स्पर्धेमध्ये कुमारी मुलींचा गट यामध्ये प्रथम क्रमांक प्रांजली नागेश साठे तर द्वितीय क्रमांक भक्ती आलोक उरणे व तृतीय क्रमांक अभिरुची मुकुंद वाडकर यांनी पटकाविला. यामध्ये उत्तेजनार्थ विजेते म्हणून आरती अनिल घाडगे, आदिती अण्णासाहेब पवार, शुभ्रा विकास माने, संस्कृती प्रसन्नकुमार शहा, आराध्या अनिल घाडगे यांनाही बक्षिसे देण्यात आली. विवाहित महिला या गटांमध्ये महिलांनी अक्षरशः उत्स्फूर्त सहभाग नोंदविला यामध्ये प्रथम क्रमांक विशाखा अविनाश अवघडे तर द्वितीय क्रमांक अपर्गा पौडवाल व तृतीय क्रमांक सुनंदा दत्तात्रय सुतार यांनी पटकाविला.
बकेट बॉल गेम या स्पर्धेमध्ये ललिता दीपक मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर वैष्णवी सचिन पिसे यांनी द्वितीय क्रमांक व कोमल आनंद चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
उखाणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राणी चंद्रकांत गाडे तर द्वितीय क्रमांक वैशाली किशोर मेहेर व तृतीय क्रमांक पूनम अमोल बाळापुरे यांनी पटकाविला.
यावेळी झालेल्या फनी गेम स्पर्धेमध्ये चार महिलांचा एक गट असे अनेक गट सहभागी झाले होते यामध्ये विजेत्या गटातील महिला सोनाली महादेव साठे, माधुरी दीपक सावंत, शहनाज साजिद आतार, फिरदोश अमर आतार यांनी फनी गेमचे बक्षीस पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

सदरचा कार्यक्रम श्री महादेव देवस्थान देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख व विश्वस्त पांडुरंगराव गोविंदराव माने देशमुख यांच्या आयोजनाखाली पार पडला. या कार्यक्रमासाठी ट्रस्टतील सर्व गाळेधारक यांचेही विशेष सहकार्य लाभले. परीक्षक म्हणून शशिकांत तेरखेडकर सर, हरिभाऊ माने सर, सौ सुनंदा मुकुंद माने, सौ संध्या दत्तात्रय माळी यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेत्या मुलींना व महिलांना घरगुती उपयोगी वस्तू व ट्रस्टीच्या नावाचे प्रशस्तीपत्र देण्यात आले तर प्रथम क्रमांकाच्या महिलांना पैठणी साडी बक्षिस म्हणून देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती सुरज गाडेकर, विद्या महेश स्वामी, राणी आनंद बनकर, विद्या चंद्रकांत येवारे (चव्हाण), प्रियंका सचिन बनकर, कोमल आनंद चव्हाण, राजश्री दत्तात्रय साळुंखे, लोकविकास शिक्षण संस्था वेळापूर, श्री स्वामी समर्थ केंद्र वेळापूर व सर्व महिला बचत गट वेळापूर यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी नीलमताई माने देशमुख, वृषालीताई माने देशमुख, नीलिमाताई माने देशमुख, अमृता माने देशमुख, अंजली मोहिते, शिल्पा मोहिते, शितल माने देशमुख, अश्विनी ताटे, सिंधू लोंढे, सोनाली दोशी, कांचन हनुमंत साठे, रूपाली शिंदे, निशा शिंदे, कांचन दयानंद साठे, पुनम माने देशमुख, रेश्मा माने देशमुख, जयश्री भोसले, नम्रता जंगले, शितल घाटगे, रूपाली जाधव, संगीता जाधव, राजकन्या माने देशमुख, दिपाली साळुंखे यांनीही विशेष सहकार्य केले. कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात पार पडला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



