अभिनेता स्व. दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा देणारा एक प्रकाशझोत

स्व. दादा कोंडके यांचे कार्यक्षेत्र, चित्रपट, नाटक, लोकनाट्य,
बारामती झटका
८ ऑगस्ट १९३२ साली जन्मलेले दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके. मुंबईच्या नायगाव मध्ये मिल मजुराच्या घरी गोकुळाष्टमीच्या दिवशी दादा कोंडके यांचा जन्म झाला.
सुरुवातीला दादांचे बालपण हे नायगावच्या वस्तीतल्या चाळीमध्ये गेले. बँड पथकात काम करत असताना त्यांना चाळीतले लोक हे बँडवाले दादा या नावाने ओळखू लागले. बँड पथकात काम करत असताना ते राष्ट्र सेवादलात काम करू लागले. सेवादलात काम करत असताना त्यांची ओढ सांस्कृतिक कार्यक्रमात होऊ लागली. त्यानंतर नाटके करीत असताना इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला.
दादा कोंडके यांनी दादा कोंडके आणि पार्टी हे कला पथक स्थापन केले. हे सर्व करीत असताना त्यांची ओळख लेखक वसंत सबनीस यांच्या बरोबर झाली.
अशातच दादा कोंडके यांनी एक नाटक कंपनी स्थापन केली आणि त्यानंतर त्यांनी वसंत सबनीस यांना लिखाण करण्याची विनंती करून पुढे वसंत सबनीस यांनी ‘इच्छा माझी पुरी करा’ हे वगनाट्य लिहिलं. हे वगनाट्य करत असताना दादांना वेगळीच ओळख निर्माण झाली होती.
या वगनाट्याचे पंधराशेच्यावर प्रयोग झाले आणि अशातच भालजी पेंढारकर यांची नजर दादा कोंडके यांच्यावर पडली. आणि पेंढारकरांनी दादांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली. आणि प्रथमच अभिनेता म्हणून दादांना ‘तांबडी माती’ या चित्रपटात संधी मिळाल्यानंतर
दादा चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरले. त्यांनी पहिलाच निर्माण केलेला चित्रपट म्हणजे ‘सोंगाड्या’. या चित्रपटाने दादांना खरी ओळख निर्माण करून दिली. पुढे त्यांनी चित्रपट निर्माण करत असतानाच अनेक दर्जेदार चित्रपटाची निर्मिती केली.
१९७१ – सोंगाड्या,
१९७२ – एकटा जीव सदाशिव,
१९७३ – आंधळा मारतो डोळा, १९७५ – पांडू हवालदार,
१९७६ – तुमचं आमचं जमलं,
१९७७ – राम राम गंगाराम,
१९७८ – बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८० – ह्योच नवरा पाहिजे,
१९८७ – आली अंगावर,
१९८८ – मुका घ्या मुका,
१९९० – पळवा पळवी,
१९९२ – येऊ का घरात १९९४ – सासरचे धोतर
हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले. १९८१ साली ‘गनिमी कावा’ त्यांनी दुसऱ्या बॅनरखाली केला.
दादांची चित्रपटातली टीम फिक्स असायची. संगीतकार राम-लक्ष्मण, पार्श्वगायक महेंद्र कपूर, उषा मंगेशकर, नायिका उषा चव्हाण. सुरुवातीला त्यांचे पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी असायचे.
अंजना, मुमताज, मधू कांबीकर, मोहन कोठीवान, वसंत शिंदे, रत्नमाला, जयश्री टी, दीनानाथ टाकळकर अशी बरीच कलाकार मंडळी त्यांच्या चित्रपटात असायची.
लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांनी केले. हिंदीतून तेरे मेरे बीच में (१९८४), अंधेरी रात में दिया तेरे हात में (१९८५), खोल दे मेरी जुबान (१९८६), आगे की सोच (१९८९) ह्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. १९७७ साली पांडू हवालदार ह्या मराठी चित्रपटाच्या धर्तीवर “चंदू जमादार” हा गुजराती चित्रपट काढला.

वादग्रस्त दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवातही वादग्रस्तच असायला हवी, असाच विधिसंकेत असावा…..
कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या ‘सोंगाड्या’ चित्रपटाच्या आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा ‘तीन देवियॉं’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले.
दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले. मग काय विचारता ?, शिवसैनिकांनी कोहिनूरबाहेर “राडा” घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच ‘सोंगाड्या’ प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले.. पण ‘सोंगाड्या’ सुपर डुपर हिट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस दादांनी आणले…
माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी, राखण करते मी रावजी,
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
औंदाचं गं वरीस बाई मी सोळावं गाठलं गं
चोळी दाटली अंगाला बाई कापड का फाटलं गं
काळीज माझं धडधड करी, उडते पापणी वरचेवरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
नार गोमटी तू देखणी ठुसका बांधा ठसला मनी
फुलराणी जीव माझा साजणी गं जडला तुझ्यावरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी
वांगी तोडते मी रावजी,
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
गोर्या गालावरी गं माझ्या लाली लागली दिसू गं
अंघोळीला बसले, माझं मलाच येई हसू गं,
पदर राहिना खांद्यावरी पिसाट वारं भरलं उरी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
शुक्राची ग तू चांदणी, लाजू नको ग नाही कुणी
मंजुळा, जीव तुझ्यावर खुळा ग झाला खरोखरी
माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी
वांगी तोडते मी रावजी,
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
चित्रपट : सोंगाड्या
गीत : दादा कोंडके
संगीत : राम कदम
स्वर : जयवंत कुलकर्णी, उषा मंगेशकर
…………………………………………..
आई, माझ्या लग्नाची गं
का तुलाचं पडली घाई
बाबा, माझ्या लग्नाची हो
का तुम्हांस पडली घाई
कुणीतरी
अहो, कुणीतरी समजावा ना बाई
माझं वय काय झालचं नाही
कुणीतरी समजावा ना बाई
माझं वय काय झालंच नाही
झाले का हो डोई जड मी
अशा कोवळ्या वयात
नुकतच पहिलं पाऊल पडलं
तरुण पणात, तरुण पणात
ओठ दुधाचे न सुकले
काय कुठे मी चुकले
माझं मलाचं कळलं नाही
हौस न मजला नटण्याची
अहो मी तर साधी भोळी
हवी कशाला इतक्यातचं ही
साडी अन् चोळी, साडी अन् चोळी
गाठ कशी बाई सुटली
नको तिथं ही तुटली
कोड मलाच सुटलं नाही
काल रातीच्या सपनामंदी
एक पाहिली वरात
आज कशी मी अवचित आले
ज्वानीच्या भरात, ज्वानीच्या भरात
सांग कुठे ती लपवू
नजर कशी मी चुकवू
जो तो मलाच निरखून पाही
आई, माझ्या लग्नाची गं
का तुलांच पडली घाई
बाबा, माझ्या लग्नाची हो
का तुम्हांस पडली घाई
कुणीतरी
अहो कुणीतरी समजावा ना बाई
माझं वय काय झालंच नाही
चित्रपट : बोट लावीन तिथे गुदगुल्या
स्वर : उषा मंगेशकर
गीत : दादा कोंडके
संगीत : राम लक्ष्मण
……………………………
अगं ईमला तुझा माझा जोडा भारी जमला
अगं ईमला तुझा माझा जोडा भारी जमला
मला दावा उटी नाहीतर सिमला सिमला सिमला
आता बोंबला…
धुकं आलंया लय गं दाटून चल ईथंच घेऊया भेटून
नको चालू असा मला खेटून साडी गुलाबी जाईल…
साडी गुलाबी जाईल…
साडी गुलाबी जाईल फाटून
सारं रघात आलंया गोठून उब व्हटाची देशील का वाटून
नका मारु मिठी अशी पाठून कोरी जवानी जाईल…
कोरी जवानी जाईल…
कोरी जवानी जाईल बाटून
मला थंडीचा वारा झोंबला झोंबला झोंबला
आता बोंबला
अगं, ईमला तुझा माझा जोडा भारी जमला
माझ्या रूपानं तुम्ही का झिंगला झिंगला झिंगला
आता बोंबला…
तुझ्या व्हटांत डाळींब फुटं गं
माझं काळीज तिळ तिळ तुटं
तुम्ही मुलखाचं चावट वं सांगा सोडाल का. ..
जरा सोडाल का…
माझं सोडाल का मनगट
तुझी लवलवती कंबर गं जसं हलतंया झुंबर
माझ्या दिलाच्या किल्ल्यावर हो, तुम्ही चढांल का ..
सांगा चढांल का …
आता चढांल का सरसर
सारं करून जीव हा दमला दमला दमला
आता बोंबला
अगं ईमला तुझा माझा जोडा भारी जमला
माझ्यासाठी बांधा एक बंगला बंगला बंगला
आता बोंबला…
………………………………..
चित्रपट : आली अंगावर
गीत : दादा कोंडके
स्वर : महेंद्र कपूर, उषा मंगेशकर
संगीत : राम लक्ष्मण
अशा जवळपास सर्वच चित्रपटातील दादांची गाणी सुपरहिट ठरली. आजही दादांच्या चित्रपटाची व चित्रपटातल्या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.
सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून बसणाऱ्या या अवलियाचं १४ मार्च १९९८ रोजी दुःखद निधन झाले. अशा या महान कलाकारास संगीतमय भावपूर्ण आदरांजली…
माहिती व संकलन
चंद्रकांत केदारे
मो:7020447834
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



