ह. भ. प. गुरूवर्य केशव महाराज उखळीकर यांचे मोरोची येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. श्रीमती समाबाई सुळ पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
मोरोची (बारामती झटका)
मोरोची, ता. माळशिरस येथे कैलासवासी श्रीमती समाबाई आप्पासाहेब सुळ पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन मंगळवार दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी सागर उद्योग समूह, मोरोची येथे करण्यात आले आहे. यावेळी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची चे माजी अध्यक्ष ह. भ. प. गुरुवर्य केशव महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांना ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्था मोरोची यांची कीर्तनाची साथ मिळणार आहे. तसेच कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोरोची ता. माळशिरस, येथील स्व. श्रीमती समाबाई आप्पासाहेब सुळ पाटील यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वार्धक्याने गुरुवार दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी दुःखद निधन झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. मोरोची गावचे माजी सरपंच शिवाजीराव सुळ पाटील व माजी उपसरपंच तानाजीराव सुळ पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या तर, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील यांच्या आजी होत्या. त्यांच्यावर शिंगणापूर पाटी नजीक मोरोची हद्दीतील राहत्या घराशेजारील शेतामध्ये अंतिमसंस्कार करण्यात आले होते.
समाबाई यांचा जन्म दडसवाडा, पांगरी ता. मान, येथील सिद्धेश्वर दडस यांच्या परिवारामध्ये १९३२ साली झालेला होता. माळशिरस तालुक्यातील मोरोची गावचे प्रगतशील बागायतदार आप्पासाहेब सुळ पाटील यांच्याशी स्वातंत्र्यपूर्व काळात लग्न झालेले होते. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संसाराचा कष्टातून स्वर्ग बनविलेला होता. उभयतांना श्री. शिवाजीराव व श्री. तानाजीराव ही दोन मुले तर सौ. इंदुमती दत्तात्रेय रुपनवर डोंबाळवाडी (कु.) ता. माळशिरस, सौ. सुमन संपत अर्जुन, चिखली, ता. इंदापूर, सौ. निलावती तानाजी रुपनवर लोणंद, ता. माळशिरस अशा तीन मुली आहेत.
स्वर्गीय आप्पासाहेब यांचे दि. ०४/०४/१९८४ रोजी अर्धांगवायू मुळे दुःखद निधन झाले होते. त्यानंतर मातृत्व आणि पितृत्व दोन्हीही जबाबदाऱ्या समाबाई यांनी सांभाळलेल्या होत्या. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ व धार्मिक वृत्तीच्या होत्या. सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी मुलांचा व नातवांचा संसार करण्यामध्ये हातभार लावलेला होता.
समाबाई यांच्या दुःखद निधनाने सुळ पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. सुळ पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच, बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली…
तरी नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त सुळ पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



