चौंडी, होळ मुरूम आणि वाफगाव, गोकर्ण येथील होळकर संस्थानच्या व्यवस्थापकपदी आदित्य फत्तेपूरकर

पंढरपूर (बारामती झटका)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी संस्थान यांच्याकडून पंढरपूरच्या आदित्य फत्तेपूरकर यांची चौंडी, होल मुरूम, वाफगाव, गोकर्ण आणि पंढरपूर येथील होळकर यांच्या खाजगी मालमत्तांच्या व्यवस्थापक पदी नुकतीच इंदोर येथून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण देशभरामध्ये खास करून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी यात्रेकरूंना राहण्यासाठी आणि तीर्थक्षेत्रे असणाऱ्या देवी देवतांच्या सेवेसाठी मठ, मंदिरे, वाडे यांची उभारणी केली. यातच अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असणाऱ्या चौंडी या ठिकाणी होळकर संस्थानाचा मोठा वाडा आहे. तसेच होळकरांचे मूळस्थान असणाऱ्या होल मुरूम व वाफगाव या ठिकाणच्या वाड्यांची देखभाल, दुरुस्ती आणि संगोपनाची जबाबदारी आता आदित्य फत्तेपूरकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पंढरपुरातही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मोठा टोलेजंग वाडा वारकरी भक्तांसाठी उभा केला. या वाड्याची जबाबदारी ही सद्यस्थितीत फत्तेपूरकर यांच्याकडे होती. यामध्येच आता चौंडी, होल मुरूम व वाफगाव अशा तीन संस्थानासह कर्नाटकातील गोकर्ण, महाबळेश्वर या तीर्थक्षेत्र असणाऱ्या होळकर वाड्याची जबाबदारी देखील फत्तेपुरकर यांच्यावर इंदोर येथील खाजगी देवी आहिल्याबाई होळकर चारिटी ट्रस्टने सोपवली आहे.

आदित्य फत्तेपुरकर हे गेल्या सात वर्षापासून पंढरपूरच्या होळकर वाड्याची व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पाहत आहेत. तसेच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी पंढरपुरात विठ्ठल मंदिरात सुरू केलेल्या प्रथा, परंपरा, होळकर वाड्यातील रामजन्मोत्सव, आषाढी कार्तिकेतील रथोत्सवातील पूजा अशा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी सुरू केलेल्या सर्व परंपरा गेल्या सात वर्षात मोठ्या नेटाने अबाधित ठेवल्या आहेत. याच कामाची पावती म्हणून खाजगी होळकर चारिटी ट्रस्ट इंदोर यांच्याकडून होळकरांचे मुळगाव होळ मुरूम, आहिल्यादेवींचे जन्मस्थान चौंडीची जबाबदारी आता फत्तेपूरकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आदित्य फत्तेपूरकर यांचे या निवडीबद्दल इतिहास प्रेमी तसेच धनगर समाज, आणि सामाजिक संघटनातील कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



