गोरे वस्ती, हनुमान नगर येथे सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

मारकडवाडी (बारामती झटका)
मारकडवाडी, ता. माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी कै. बापू नामदेव गोरे यांच्या पुण्याईने सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन रविवार दि. १०/८/२०२५ ते शनिवार दि. १६/८/२०२५ पर्यंत श्री क्षेत्र वश्या मारुती मंदिर, हनुमान नगर, गोरे वस्ती, मारकडवाडी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदाचे २४ वे वर्ष आहे. या सप्ताहात रविवार दि. १०/८/२०२५ रोजी सकाळी ११ वा. ग्रंथपूजन व शनिवार दि. १६/८/२०२५ रोजी पहाटे ५ ते ६ रुद्र अभिषेक होणार आहे.
या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ५ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते ११ गाथा भजन, दुपारी १२ ते ३ जेवण व विश्रांती, दुपारी ४ ते ५ ज्ञानेश्वरी पारायण, सायं ५ ते ६ हरिपाठ, सायं ६ ते ७ प्रवचन व जेवण, रात्री ९ ते ११ किर्तन, व ११ ते २ जागर असा असणार आहे.
या सप्ताहात व्यासपिठ चालक ह.भ.प. शहाजी महाराज वाघमोडे. ह.भ.प. दतात्रय लक्ष्मण गायकवाड, गायनाचार्य – ह.भ.प. अंकुश महाराज तनपुरे, ह.भ.प. संदिप महाराज हजारे, मृदंगमनी – ह.भ.प. संतोष महाराज वावळे हिंगोली, ह.भ.प. रोहित महाराज गोरे, हरिपाठ व किर्तन साथ – ह.भ.प. शहाजी वाघमोडे, भिमराव दडस, बाबु आद्रट, जगनाथ गोरे, ह.भ.प. सुभाष गायकवाड, दत्तात्रय मारकड, विणा पहारेकरी – सामुदायीक विणा पहारेकरी पंचक्रोशी, हनुमाननगर, काकडा ह.भ.प. जगन्नाथ गोरे, बाबु आद्रट, सोपान मारकड, चोपदार – ह.भ.प. आनंदा जगनाथ गोरे, ह.भ.प. नारायण सुतार, ग्रंथपूजन, विणापुजन, दिपप्रज्वलन, पारायण प्रारंभ उपस्थिती मान्यवर व ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
रविवार दि. १०/०८/२०२५ रोजी ह.भ.प. रमेश महाराज लांडगे, नातेपुते यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे तर दुपारचे अन्नदाते श्री. मारुती दडस, तर सायंकाळचे अन्नदाते श्री. शिवाजी बोराटे, शंकर राऊत यांच्यावतीने असणार आहे. तसेच शेंडेवाडी मारकडवाडी यांचे हरी जागर असणार आहे. सोमवार दि. ११/०८/२०२५ रोजी ह.भ.प. अजिंक्य महाराज पिसे, वेळापुर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तर सकाळचे अन्नदाते श्री. दत्तात्रय गायकवाड व सायंकाळचे अन्नदाते श्री. यशवंत बोराटे हे आहेत. या दिवशी हनुमान नगर पंचक्रोशी भजनी मंडळाचे हरिजागर असणार आहे. मंगळवार दि. १२/०८/२०२५ रोजी ह.भ.प. अभिमन्यु महाराज कदम, दहिगांव यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तर या दिवशी दुपारचे अन्नदाते श्री. नामदेव राऊत व श्री. संजय राऊत तर सायंकाळचे अन्नदाते श्री. मच्छिंद्र गायकवाड हे आहेत. या दिवशी तामशिदवाडी ५० फाटा यांचा हरीजागर असणार आहे. बुधवार दि. १३/०८/२०२५ रोजी ह.भ.प. कु. आरतीताई भुजबळ, नातेपुते यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तर या दिवशी दुपारचे अन्नदाते श्री. विठ्ठल दडस तर सायंकाळचे अन्नदाते श्री. संजय चव्हाण हे आहेत. या दिवशी नावडकर वस्ती, आद्रट वस्ती यांचा हरी जागर असणार आहे. गुरुवार दि. १४/०८/२०२५ रोजी सायंकाळी ९.३० ते१२ ह.भ.प. संतोष महाराज वाबळे, नांदुरा श्री जानाई सांप्रदायिक भारुड मंडळ राजाळ यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तर या दिवशी दुपारचे अन्नदाते श्री. सोपान मारुती वाघमोडे तर सायंकाळचे अन्नदाते श्री. सावता गोरे हे आहेत. या दिवशी सदाशिवनगर, खुळेवाडी, चाहूरवस्ती यांचा हरी जागर असणार आहे. शुक्रवार दि. १५/०८/२०२५ रोजी ह.भ.प. ऋषिकेश महाराज मोरे, देहु यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तर या दिवशी सकाळचे अन्नदाते श्री. विठ्ठल बोराटे व श्री. तुकाराम बोराटे तर सायंकाळचे अन्नदाते श्री. जगु गोरे हे आहेत. या दिवशी नरेंद्र महाराज सेवा मंडळ फडतरी यांचे हरीजागर असणार आहे. शनिवार दि. १६/०८/२०२५ रोजी ह.भ.प. संस्कार महाराज खंडागळे, सांगोला यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. यादिवशी काल्याची पंगत व कळस जयंती होणार आहे.

या सप्ताहासाठी श्री. वैभव नाना तरटे ४१,०००/-, श्री. सोपान मारुती वाघमोडे ३१,०००/-, श्री. निहाल पांडुरंग जठार २१,०००/-, श्री. पांडूरंग बापू चोपडे ११,०००/- यांनी देणगी दिली आहे.
गुरुवार दि. १४/०८/२०२५ रोजी ज्योत असणार आहे. यासाठी श्री. प्रकाश गुन्याबा गोरे व किसन निवृत्ती गोरे यांचा नाष्टा असणार आहे.
शनिवार दि. १६/०८/२०२५ रोजी काल्याच्या पंगतीचे अन्नदाते श्री. दिपक गोरे, सचिन गोरे, नितीन राऊत, शशीकांत राऊत, रोहित राऊत, सुभाष मारकड, मारुती बोराटे, ज्ञानदेव बोराटे, प्रवीण गोरे, बापू खुळे, मल्हारी वाघमोडे, नाना तरटे, बळी पिसाळ, रुद्राक्ष शिंदे, दादा गोरे, योगेश चव्हाण, कैलास गायकवाड, पोपट पिसाळ, रामा पिसाळ, दिपक मोहिते, अशोक राऊत जोतीराम खुळे, पोपट राऊत, अविनाश अवघडे, शिवाजी कोडलकर, दादा दडस, तानाजी दडस, सुभाष बोराटे, शिवाजी गोरे, रामा भुजबळ, मोहन चोपडे, संतोष बोराटे, हनुमंत बोराटे, नाना गोरे, धनाजी कांबळे, अप्पाजी गोरे, सचिन वाघुले, राजेंद्र पिसाळ, आदेश वाघमोडे, गणेश भुजबळ, प्रदीप चव्हाण, राजेंद्र बोराटे, संजय बोराटे, अनिल दडस, राजेंद्र शेळके, संजय पिसाळ, शंभू राजाराम जाधव, दाजीराम पिसाळ, भरतेश गोरे, युवराज मारकड, वैभव चोपडे, विजय आद्रट, कृष्णा बोराटे, आनंदा बोराटे, सचिन बोराटे, आप्पाजी भुजबळ, समाधान टेंबरे, सुनील दडस, गणेश मारकड, नितीन लवटे, जय हरी पालवे, सागर पालवे, सोहम हनुमंत धाईंजे, बापू मारकड, आप्पा मारकड, अविनाश कोडलकर, जयदीप वाघुले, अमोल गोरे, विवांश राऊत, स्वप्नील गोरे, अमर गोरे, संग्राम चोपडे, युवराज दुर्योधन मारकड, संदीप भुजबळ, वैभव दडस, दत्तू वाघमोडे, हनुमंत राऊत, निखिल काळे, आदेश कोडलकर, विठ्ठल अर्जुन, प्रणव ढोबळे, लाला भुजबळ, चंदू तोरणे, सत्यवान भुजबळ, पोपट पालवे, विठ्ठल बर्गे हे आहेत.

सदर कार्यक्रमाचे संयोजक आनंदा हरी बोराटे, पांडुरंग बापू चोपडे, सुभाष दत्तात्रय गायकवाड, किरण तुकाराम गोरे व पोपट नामदेव राऊत हे आहेत. तरी मारकडवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ हनुमान नगर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



