खंडाळी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अनोख्या उपक्रमांनी साजरी…

खंडाळी (बारामती झटका)
मौजे खंडाळी, ता. माळशिरस येथे आज दि. 12 ऑगस्ट रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्ताने “सामाजिक बांधिलकीच्या विचारांची जयंती” हा उद्देश ठेऊन येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती समितीने प्रत्येक जयंती समिती पुढे आदर्श निर्माण करून दिला, त्याबद्दल त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. हा कार्यक्रम लहुजी शक्ती सेनेचे युवक तालुका अध्यक्ष मा. मारुती (भाऊ) अवघडे यांच्या आयोजनात राबवण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये प्राथमिक शाळा खंडाळी येथील 130 विद्यार्थ्यांना शालेय बॅग भेट देण्यात आल्या. तसेच विविध स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विक्रम (सोनू) पराडे-पाटील, माळशिरस तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी सौ. महामुनी मॅडम, खंडाळी-दत्तनगर च्या विद्यमान सरपंच सौ. सुनीता सुरवसे, जिल्हा परिषदचे मा. सदस्य बाळासाहेब धाईंजे, जय मल्हार क्रांति संघटनेचे जिल्हा अध्यक्ष काकासाहेब जाधव, रिपब्लिकन पार्टीचे मिलिंद नाना सरतापे, मा. सरपंच श्री. बाबुराव पताळे, मा. उपसरपंच विठ्ठल पताळे, विनोद थिटे, वेळापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गोसावी साहेब, श्री. अमोल पताळे, श्री. प्रवीणसिंह पताळे पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. भक्ती नाचणे, केंद्र प्रमुख राजेंद्र उकिरडे आदी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शाहू भोसले, लक्ष्मण खंडागळे, नागेश वाघंबरे, आबासाहेब वाघमारे, राहुल कटके, राहूल खंडागळे, सुनील खंडागळे, अजय कांबळे, स्वप्नील सकट, अमोल खवळे, अभयकुमार वाघमारे, विशाल खंडागळे, देवा भोसले, बंडू खंडागळे, बापू अवघडे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समित्याच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



