स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

बारामती (बारामती झटका)
भारतीय स्वातंत्र्याचा ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव सचिन यादव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरासदार, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. श्री. नावडकर यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारुन सर्व उपस्थित मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



