सदाशिवनगर येथे आईच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत वृक्षारोपण

सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर, ता. माळशिरस येथिल सुप्रसिद्ध डॉक्टर ज्ञानदेव जगन्नाथ ढोबळे यांच्या आई शेवंताबाई जगन्नाथ ढोबळे यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. आपल्या आईच्या आठवणी कायम राहाव्यात, यासाठी आईच्या स्मरणार्थ सदाशिवनगर येथिल स्मशानभूमीत वृक्षारोपण करून एक आदर्श निर्माण केला आहे.
गाव तर आपण स्वच्छ करतो पण, त्या बरोबर गावची स्मशानभूमी देखील स्वच्छ, सुंदर आणि सावली देणारी रहावी राहावी, म्हणून आपण सर्वांनी प्रयत्नशील राहून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, असा संदेश देखील दिला आहे.

यावेळी डॉ. ढोबळे यांनी सांगितले की, माझ्या आईला पहिल्यापासून झाडांची आवड होती. तिचं सर्व आयुष्य रानावनात काबाड कष्ट करण्यात गेले आहे. तिची आठवण म्हणून वृक्षारोपन करून तिच्या आठवणी कायम आमच्या डोळ्यासमोर ठेवणार आहोत.

यावेळी वृक्षारोपण व परिसर स्वच्छ करण्यासाठी जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्व टिमने विशेष सहकार्य केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



