“शेतकऱ्याचा नाद करायचा नाय”, सोन्या बैलाचे प्रथम पुण्यस्मरण काळे परिवार यांचा मुक्या प्राण्यांचा स्तुत्य उपक्रम….

सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह. भ. प. सुनील महाराज यादव, मिरडे यांचे यांचे सोन्या बैलाच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त सुश्राव्य कीर्तन होणार….
लाख येतील, लाख जातील, पण तुझ्यासारखा बादशाह परत कोणी नाही भावपूर्ण श्रद्धांजली सोन्या….
तामशीदवाडी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्याचा नाद करायचा नाय… आपल्या आवडत्या सोन्या बैलाचे प्रथम पुण्यस्मरण सौ. बायडाबाई तात्यासो काळे व श्री. तात्यासो केसू काळे यांनी सोन्या बैलाच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मंगळवार दि. 19/08/2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह. भ. प. सुनील महाराज यादव मिरडे यांचे सुश्राव्य कीर्तन ठेवलेले आहे. कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे 46 फाटा नजिक मासाळ वस्ती, तामशीदवाडी, ता. माळशिरस येथे आयोजित केलेले आहे.


आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील… अशा पद्धतीने सोन्या बैलाची आठवण काळे परिवार यांना कायम राहणार आहे. सोन्याच्या अंगामध्ये असलेले गुण व मालकाविषयी असलेले प्रेम काळे परिवार कधीही विसरू शकत नाहीत. अतिशय गुणवान, शांत असणारा बैल काळे परिवार यांच्या घरातील सदस्य बनलेला होता. अचानक सोन्याच्या जाण्याने काळे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. सोन्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता काळे परिवार यांनी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करून समाजामध्ये मुक्या प्राण्यांचा लळा कसा असतो, याचे समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



