विझोरीत कृषीकन्यांकडून सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA).

विझोरी (बारामती झटका)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज येथील कृषीकन्यांनी सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA) हणुमान मंदिर विझोरी येथे प्रात्यक्षिक दाखवले.
सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA) ही विकास कामांमध्ये स्थानिक समुदायांना प्रकल्पांच्या नियोजन आणि व्यवस्थापनात सहभागी करून घेण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धत आहे. गावाचे दृश्यमान प्रतिनिधित्व तयार करणे, ज्यामध्ये संसाधने पायाभूत सुविधा आणि सामाजिक संरचना यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या भागांचे आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचे निरीक्षण करणे, ग्रामीण लोकसहभागीय मूल्यावलोकन योग्यरितीने, शिस्तबद्धपणे केल्यास ग्रामस्थांचा, लोकांचा सहभाग मिळवून त्यांच्यापर्यंत पाण्याचे महत्त्व व वापर याबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे शक्य आहे. यावेळी प्रात्यक्षिकादरम्यान विझोरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

सहभागी ग्रामीण मूल्यांकन याबददल माहिती दिली. कृषीकन्या वैभवी ढेंबरे, प्रणोती कोरे, ऋतुपर्णा सावंत, वैष्णवी शिंदे, प्रिती फडतरे, अमृता बांदल, तेजश्री शिंदे उपस्थित होत्या
या कृषीकन्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटिल, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, तसेच प्रा. एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एम. एम. चंदनकर, प्रा. एच. व्ही कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



