आर्थिककृषिवार्ताताज्या बातम्याराजकारणसामाजिक

केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियुषजी गोयल यांची पालकमंत्री जयकुमार गोरे व मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली…

सातारा व सोलापूर जिल्ह्याचा महत्त्वपूर्ण इंडस्ट्रियल कॉरिडॉर एमआयडीसी प्रक्रिया वेगाने करण्यासाठी सविस्तर चर्चा झाली..

दिल्ली (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा.श्री. जयकुमार गोरे (जयाभाऊ) यांनी 20 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियुषजी गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील म्हसवड येथील नियोजित इंडस्ट्रियल कॉरिडॉर एमआयडीसीची उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाली. तसेच सातारा आणि सोलापूर जिह्यातील विविध विकास प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. या प्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर (दादासाहेब) उपस्थित होते.

म्हसवड एमआयडीसीच्या माध्यमातून या भागाच्या उन्नतीचा, प्रगतीचा आणि समृद्धीचा एक नवा अध्याय प्रारंभ सुरू होणार असून या एमआयडीसीच्या माध्यमातून या भागात हजारो कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून हजारो तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

एमआयडीसीला पाणी आणि विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण कशा पद्धतीने बनवता येईल, रोजगारक्षम उद्योग कसे आणता येतील आणि शेतीपूरक उद्योग आणून शेतकऱ्यांचे आणि जनतेचे हित कसे साधता येईल, यादृष्टीने ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे (जयाभाऊ) माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील माय-बाप जनतेच्या आशीर्वादाने माण-खटाव जलक्रांती, हरितक्रांती, औद्योगिक क्रांती, शैक्षणिक क्रांती विकास एक्स्प्रेस टप्पा 4 चे स्वप्न साकार करण्यासाठी समाजहितासाठी, लोककल्याणासाठीच गेल्या १५-२० वर्षांपासून अथक प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कायम दुष्काळी असलेल्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघासह बाजूच्या मतदारसंघातसुद्धा हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून उरमोडी जिहे कठापूर ची योजना पूर्ण केली. कृष्णामाईचे पाणी माण-खटाव मध्ये प्रत्यक्षात आणून दाखवले आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेचे ७५० कोटी रुपयांचे काम सुरू आहे. विविध विकासकामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे परिसरातील नागरिकांचे जीवन सुखकर झाले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom