मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या प. म. का. सदस्य व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी सचिन रणदिवे यांची निवड

मारकडवाडी (बारामती झटका)
मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वासराव मोहिते साहेब यांच्या आदेशाने व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे मारकडवाडी, ता. माळशिरस येथील साप्ताहिक माळशिरस पॅटर्न व जनसत्ता मराठी न्युजचे मुख्य संपादक सचिन रणदिवे यांची पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली. मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार समिती ही समिती महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित या महामंडळाच्या विविध अडीअडचणी संदर्भात काम करणार आहे.

ऑनलाइन झालेल्या बैठकीत झालेल्या निवडीनंतर सचिन रणदिवे म्हणाले, मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून कर्ज मागणी करणाऱ्या व्यक्तींच्या समस्या महामंडळ आणि बँक स्तरावरती निर्भीडपणे मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. या समितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील युवकांनी सहभागी होऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नावर संघटित लढा उभारण्यासाठी युवकांनी समितीत सामील व्हावी असे आवाहन करून येणाऱ्या काळामध्ये महामंडळाच्या अडीअडचणी संदर्भात काम करून मागासवर्गीय दलित लोकांना न्याय देण्याचे काम करण्यात येईल असे मत व्यक्त केले आहे.
त्यांच्या या निवडीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



