मेघश्री गुंड हिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

माढा (बारामती झटका)
क्रीडा युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी 25 ऑगस्ट रोजी माढा येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करीत मेघश्री राजेंद्रकुमार गुंड हिची मुलींच्या 17 वर्षे वयोगटातून जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मेघश्री गुंड हिने पाच पैकी चार राऊंड जिंकून ही उज्ज्वल कामगिरी केली आहे. ती माढा येथील सीबीएसई बोर्डाच्या आर्या पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत आहे. मोडनिंब येथे रविवारी 24 ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतही तिने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मेडल व प्रमाणपत्र पटकावले आहे. तिला प्राचार्य सागर थोरात, क्रिडाशिक्षक शुभम पुरवत, सुप्रिया ताकभाते, आई मेघना गुंड, प्राथमिक शिक्षक सुधीर गुंड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ती विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांची कन्या आहे.
या निवडीबद्दल तिचे अभिनंदन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे, गटशिक्षणाधिकारी विकास यादव, सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, तालुका क्रिडा समन्वयक संजय शिंदे यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



