माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील श्री क्षेत्र भंडोबा देवस्थान मंदिर ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्यास अंतिम टप्पा…..

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या आशीर्वादाने माजी आमदार राम सातपुते यांच्या पाठपुराव्याला यश…
इस्लामपूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शक आशीर्वादाने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मौजे इस्लामपूर येथील श्री क्षेत्र भंडोबा देवस्थान मंदिरास “क” वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्याच्या मागणीला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भंडोबा भाविक भक्तामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिलेल्या पत्रामध्ये मौजे इस्लामपूर, ता. माळशिरस येथे श्रीक्षेत्र भंडोबा देवस्थान तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी सोलापूर, सांगली, सातारासह महाराष्ट्रातून वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्या भरपूर आहे. श्रावण महिन्यामध्ये सालाबादप्रमाणे यात्रा भरते त्या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांची निवारा व इतर सोयी सुविधा नसल्याने गैरसोय होत आहे. श्री क्षेत्र भंडोबा देवस्थान तीर्थक्षेत्राचा विकास व भाविकांच्या सोईसुविधेसाठी ग्रामपंचायत निधी अपुरा पडत आहे. या भाविकभक्तांना सोयी सुविधा मिळण्याकरता सदर तीर्थक्षेत्रास ‘क’ दर्जा मिळणे गरजेचे आहे.
तरी मोजे इस्लामपूर येथील श्री क्षेत्र भंडोबा देवस्थान मंदिरास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा असे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे माजी आमदार राम सातपुते यांचे पत्र घेऊन म्हसवड येथील सुप्रसिद्ध हाडाचे डॉ. बाबासाहेब दोलतडे, नानासाहेब दोलतडे रांजणी, विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे पुरंदावडे सदाशिवनगर पत्र घेऊन गेल्यानंतर तात्काळ स्वाक्षरी करून कार्यवाहीसाठी पत्र जिल्हा परिषद सोलापूर कडे रवाना करण्यात आले.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



