ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

भाजप अध्यक्ष महादेव कावळे यांचे मुस्लिम महिलांनाही अजमेरला विमानाने प्रवास उद्दिष्टाच्या पुढे टार्गेट गेले….

अकलूज (बारामती झटका)

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे, भाजपचे संघटक डॉ. निलेश ननवरे व महादेव कावळे मित्रपरिवार यांनी अकलूज पंचक्रोशीतील दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य व गोरगरीब 301 महिलांना तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाताना विमानाने व परत येताना रेल्वेने प्रवास करून बालाजीचे दर्शन घडवून दिलेले होते.

रक्षाबंधन निमित्त पहिल्यांदाच विमानाने प्रवास केलेल्या लाडक्या बहिणी यांनी लाडका भाऊ महादेवभाऊ कावळे यांना राख्या बांधण्यात आलेल्या होत्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना लवकरच अकलूज पंचक्रोशीतील 151 मुस्लिम महिलांना अजमेर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे दीक्षा घेतलेल्या ठिकाणी 151 बौद्ध महिलांना विमानाने प्रवास करून अजमेर व नागपूर दर्शन करण्याचा संकल्प केलेला होता. अकलूज पंचक्रोशीतील मुस्लिम समाजातील 151 महिलांचे उद्दिष्ट होते मात्र 201 महिलांनी आपली नाव नोंदणी व कागदपत्रे जमा केलेली आहेत. भाजपचे शहराध्यक्ष महादेवराव कावळे यांच्यावर मुस्लिम समाजातील महिला विश्वास टाकून विमान प्रवासासाठी सज्ज झालेल्या आहेत. मुस्लिम महिला सुद्धा पहिल्यांदाच विमानामध्ये प्रवास करणार आहेत.

महादेव भाऊ कावळे यांच्या अजमेर मुस्लिम महिलांना दर्शनामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य जपले जात आहे. भारतीय जनता पक्ष आणि मुस्लिम समाज महिला भगिनी यांच्यामध्ये दृढ नाते बनत चालले आहे‌‌. भारतीय बॅटिंग ठिकाणी महिलांना विमानाने घेऊन जाण्यासाठी नाव नोंदणी व कागदपत्रे अंतिम टप्प्यात आलेली आहेत. अजमेर व चैत्यभूमी नागपूर येथून आल्यानंतर तिरुपती बालाजी दर्शनासाठी पुन्हा 501 महिला घेऊन जाण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाचे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे व मित्रपरिवार यांनी निर्धार केलेला आहे.

गेली तीन वर्ष महिलांना तिरुपती बालाजी दर्शन घडवून आणले जात आहे. महादेव कावळे मित्रपरिवार प्रत्येक महिलेची घरातील महिलांसारखी खबरदारी व काळजी घेत असल्याने महिलांचा सख्ख्या भावासारखा महादेवभाऊ कावळे यांच्यावर विश्वास निर्माण झालेला आहे. दिवसेंदिवस महादेव कावळे यांचे लाडक्या बहिणींमध्ये वेगळे नाते निर्माण होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom