श्री गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद अनुषंगाने व कायदा सुव्यवस्था प्रश्न होऊ नये यासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या 81 लोकांना केले तडीपार

नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये 31 गावांचा समावेश असून सदर गावात अवैध दारू विक्रीचे गुन्हे, अवैध जुगाराचे गुन्हे, मारामारीचे, गुंडगिरीचे, दहशतीचे गुन्हे, शरीराविषयी गुन्हे दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या 81 व्यक्तींना मा. श्री. अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. श्री. प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. श्री. संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग यांच्या मार्गदर्शन व सूचनान्वये श्री गणेश उत्सव व ईद-ए- मिलाद सण उत्सव अनुषंगाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून तडीपार प्रस्ताव मा. उपविभागीय अधिकारी माळशिरस यांच्याकडे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कायदा कलम 163 (3) अन्वये प्रस्ताव नातेपुते पोलीस ठाणे मार्फत पाठवण्यात आलेले होते. त्यास मा. प्रांताधिकारी यांनी तत्वता मंजुरी दिल्याने 81 गुन्ह्यातील आरोपीना दि. 05/09/2025 ते दिनांक 07/09/2025 या कालावधीत माळशिरस तालुक्याच्या हद्दीत राहण्यास व प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली असून तालुक्यातून तडीपार करण्यात आलेले आहे. दरम्यान ते तालुक्यात आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
नातेपुते पोलीस स्टेशन


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



