मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यक्रमातून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा डावलले….

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलतनाना उमाजी शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन….
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कॅबिनेट, राज्य मंत्र्यांसह आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत महात्मा उमाजी नाईक विद्यालय, भिवडी ता. पुरंदर, येथे कार्यक्रम संपन्न होणार…
माळशिरस (बारामती झटका)
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी शासकीय जयंती रविवार दि. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता हुतात्मा उमाजी नाईक विद्यालय, भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे, येथे जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते श्री. दौलतनाना उमाजी शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जय मल्हार क्रांती संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जत विधानसभा मतदार संघाचे आमदार गोपीचंदजी पडळकर यांच्यासह उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्य मंत्र्यांसह आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यक्रमातून विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा डावलले असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली असून तर्कवितर्क सुरू झालेले आहेत.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी शासकीय जयंती सोहळ्यांमध्ये मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार व विशेष सन्मान कार्यक्रम संपन्न होणार आहेत. सदरच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, स्वागताध्यक्ष गोपीनाथजी पडळकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे सर, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मत्स्य विकास व बंदरे मंत्री नितेश राणे, कृषिमंत्री दत्तामामा भरणे, उद्योग मंत्री उदय सामंत, बहुजन कल्याण इतर मागास मंत्री अतुल सावे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, नगर विकास राज्यमंत्री सौ. माधुरीताई मिसाळ, माजी मंत्री महादेवराव जानकर, माजी मंत्री प्रकाशअण्णा शेंडगे, ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके सर, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, राज्यसभा खासदार सुनेत्राताई पवार, माढा लोकसभेचे मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप गटनेते प्रवीण दरेकर, विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, दौंड विधानसभेचे आ. राहुलदादा कुल, भोसरी विधानसभेचे आ. महेशदादा लांडगे, कोरेगाव विधानसभेचे आ. महेशदादा शिंदे, पन्हाळा विधानसभेचे आ. विनय कोरे सावकार, विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत, पुरंदर विधानसभेचे आ. विजयबापू शिवतारे, संगमनेर विधानसभेचे आ. अमोलदादा खताळ, औसा विधानसभेचे आ. अभिमन्यू पवार, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आ. समाधान आवताडे, विधानपरिषदेचे आ. योगेश टिळेकर, सोलापूर मध्य विधानसभेचे आ. देवेंद्रजी कोठे, मावळ विधानसभेचे आ. सुनील शेळके, आंबेगाव विधानसभेचे आ. दिलीप वळसे पाटील, फलटण विधानसभेचे आ. सचिनदादा पाटील, पारनेर विधानसभेचे आ. काशिनाथ दाते, पिंपरी चिंचवड विधानसभेचे आ. शंकरशेठ जगताप, छत्रपती शिवाजीनगर विधानसभेचे आ. सिद्धार्थ शिरोळे, भोर विधानसभेचे आ. शंकर मांडेकर, सांगोला विधानसभेचे आ. बाबासाहेब देशमुख, अक्कलकोट विधानसभेचे आ. सचिन कल्याणशेट्टी, विधान परिषदेचे आ. अमित गोरखे, शिरूर विधानसभेचे आ. माऊलीआबा कटके, अहिल्यानगर विधानसभेचे आ. संग्राम जगताप, सोलापूर दक्षिण विधानसभेचे आ. सुभाष देशमुख, कराड उत्तर विधानसभेचे आ. मनोजदादा घोरपडे, चंदगड विधानसभा आ. शिवाजी पाटील, जुन्नर विधानसभा मा. आ. अतुल बेनके, शिराळा विधानसभा आ. सत्यजित देशमुख, सोलापूर उत्तर विधानसभा आ. विजय देशमुख, सांगली विधानसभा आ. सुधीरदादा गाडगीळ, कराड दक्षिण विधानसभा आ. अतुलबाबा भोसले, खडकवासला विधानसभा आ. भीमराव तापकीर, चाळीसगाव विधानसभा आ. मंगेश चव्हाण, माळशिरस विधानसभा मा. आ. राम सातपुते, करमाळा विधानसभा मा. आ. संजय मामा शिंदे, बार्शी विधानसभा मा. आ. राजाभाऊ राऊत, इचलकरंजी विधानसभा आ. राहुल आवाडे, हातकलंगले विधानसभा आ. अशोकबापू माने, कसबा विधानसभा आ. हेमंत रासने, श्रीगोंदा विधानसभा आ. विक्रमदादा पाचपुते, राहुरी विधानसभा आ. शिवाजी कर्डिले, माजी आमदार संजयजी जगताप, भाजप शिरूर अध्यक्ष सतीश दादा पाचंगे, संस्थापक उमाजी नाईक शामकांत भिताडे, उद्योजक राजेंद्र जासूद, पुरंदर भाजप निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव, उद्योजक श्यामजी काळे, उद्योजक अभिजीत पन्हाळे, उद्योजक मोहनजी पाटील, पोलीस अधीक्षक पुणे संदीपसिंह गिल, पुरंदर सासवड तहसीलदार विक्रमजी राजपूत, जिल्हा परिषद सातारा सदस्य प्रकाश आप्पा चव्हाण, पोलीस निरीक्षक सासवड ऋषिकेश अधिकारी, भिवडी गावच्या सरपंच श्वेताताई चव्हाण, माजी सरपंच तात्यासाहेब भिताडे, उपसरपंच अश्विनीताई चव्हाण, फियाट सीईओ राजेश खन्ना यांच्यासह राज्यातील जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विशेष उपस्थितीत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक वंशज श्री. चंद्रकांतजी (भाऊ) खोमणे नाईक, शिवनेत्र बहिर्जी नाईक वंशज आबासाहेब जाधव नाईक, क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण नाईक वंशज श्री. लक्ष्मण (अण्णा) नाईक उपस्थित राहणार आहेत.
सदरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण जय मल्हार क्रांती संघटना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते श्री. दौलत नाना उमाजी शितोळे, जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अंकुशरावजी रामभाऊ जाधव सर, मल्हारी मार्तंड सामाजिक बहुउद्देशीय संघटना अध्यक्ष श्री. मोहनरावजी नाना मदने, जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष सुधीरजी दादा नाईक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे…


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



