ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

माळीनगरच्या सरपंच सौ. अनुपमा एकतपुरे यांनी राजीनाम्याची तलवार अखेर म्यान केली…

मोहिते पाटील समर्थक सौ. अनुपमा एकतपुरे यांची मनधरणी करण्यामध्ये यशस्वी ?, का अन्य कारणाने राजीनामा कॅन्सल झाला उलटसुलट चर्चेला उधाण….

माळीनगर (बारामती झटका)

माळीनगर, ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. अनुपमा अनिल एकतपुरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला होता. तेव्हापासून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. माळीनगर ग्रामपंचायत सरपंच पद ओबीसी महिलेसाठी राखीव होते. पावणेदोन वर्षांपूर्वी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा पराभव करून मोहिते पाटील गटाच्या सौ. अनुपमा एकतपुरे सरपंच झालेल्या होत्या. पण आता त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला होता. मोहिते पाटील समर्थक सौ. अनुपमा अनिल एकतपुरे यांची मनधरणी करण्यामध्ये यशस्वी झालेत ?, का अन्य कारणाने राजीनामा देण्याचे कॅन्सल झाले असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे. माळीनगरच्या सरपंच अनुपमा एकतपुरे यांनी राजीनाम्याची तलवार अखेर म्यान केलेली आहे.

माळीनगरसारख्या प्रतिष्ठित ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अनुपमा अनिल एकतपुरे यांनी राजीनामा दिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झालेली होती. ग्रामपंचायत अंतर्गत कामकाजातील त्रासाला कंटाळून राजीनामा दिल्याची चर्चा माळीनगर पंचक्रोशीत सुरू होती. राजीनामा दिल्यानंतर सरपंच अनुपमा एकतपुरे बाहेरगावी गेल्या असल्याची चर्चा सुरू आहे. भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु, संपर्क झालेला नसल्यामुळे राजीनामा देण्याचे खरे कारण काय आहे, याचा उलगडा अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही.

माळीनगर ग्रामपंचायत हद्दीतील मतदारांचा कानोसा घेतला असता ग्रामपंचायत अंतर्गत कामकाजातील त्रासाला कंटाळून राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू होती. रंजनभाऊ गिरमे यांनी मदतीचा विश्वास दिलेला होता, तरीसुद्धा राजीनामा दिलेला होता. सदरचा राजीनामा पडताळणीसाठी ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर राजीनामा मंजूर होईल की नाही, अशी मनामध्ये शंका असतानाच पडताळणीच्या तारखेला मोहिते पाटील समर्थक सत्ताधारी 12 सदस्य अनुपस्थितीत होते. त्यामुळे सदरच्या दिवशी बैठक कोरम अभावी तहकूब झालेली होती.

पंचायत समिती कडून दुसऱ्या बैठकीचे नियोजन केलेले होते. त्यामध्ये सरपंच सौ. अनुपमा अनिल एकतपुरे उपस्थित होत्या. सदरच्या वेळी राजीनामा परत घेत असल्याचे पत्र दिलेले असल्याचे खात्री नायक वृत्त आहे. त्यामुळे राजीनामा नाट्यावर पडदा पडलेला आहे.

सौ. अनुपमा अनिल एकतपुरे यांनी राजीनामा दिल्यापासून ग्रामपंचायतीमध्ये सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला लागणारे दाखले, उतारे मिळू शकलेले नाहीत. सरपंच नसल्याने ग्रामपंचायत अधिकारी सुद्धा बऱ्याच वेळा अनुपस्थितीत होते. सरपंच सौ. अनुपमा एकतपुरे यांनी राजीनामा देऊन काय साध्य केलं, असाही माळीनगर जनतेला प्रश्न पडलेला आहे. जर राजीनामा माघारीच घ्यायचा होता तर दिलताच कशाला, असाही प्रश्न जनतेच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत. राजीनाम्याबाबत सरपंच यांनी आपली भूमिका समाज माध्यमांसमोर स्पष्ट करावी अशी सरपंच पदासाठी मतदान करणाऱ्या जनतेची भावना आहे. जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा अशी अपेक्षा सर्वसामान्य व गोरगरीब जनतेमधून बोलली जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom