जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत एमआयटी ज्यु. कॉलेज संघाची दमदार कामगिरी

वाखरी (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेज संघाने ऐतिहासिक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. सोलापूरमधील प्रसिद्ध वालचंद कॉलेजच्या मैदानावर जरार कुरेशी यांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत एमआयटीच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धकांना कडवी झुंज देत विजेतेपदावर नाव कोरले.
१९ वर्षांखालील गटातील या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामांकित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा होता. एमआयटी ज्यूनिअर कॉलेजच्या संघाने आपल्या उत्कृष्ट संघभावनेच्या जोरावर प्रत्येक अडथळ्यावर मात केली. अंतिम सामन्यात कुशल खेळ आणि अचूक रणनीतीच्या जोरावर विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या कामगिरीमुळे पुणे विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे, जी संपूर्ण संस्थेसाठी एक अभिमानास्पद बाब आहे. यासाठी क्रीडा शिक्षक प्रवीण पिसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित केला. या यशानंतर कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ आणि हेड मिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी यांनी विजयी खेळाडूंना व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आणि आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेतील एमआयटी ज्यूनिअर कॉलेजचा विजयी संघ
कॅप्टन सोहम बहुरूपी, प्रथमेश भिंगे, धिरज कदम, अथर्व जगताप, कृष्ण शास्त्री, राजवीर कुलकर्णी, पारस शेठ, प्रणव शहा, संस्कार मुळे, अर्जन लवटे, उदय खरात, ओंकार लगड, मयुरेश थोरात, श्लोक शर्मा, समीक्ष डोलतडे, अथर्व पाटील, ओमकार तिडके आणि ओंकार देसाई.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



