ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

विझोरी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सरपंच पदी वर्षा सोमनाथ बोरकर विराजमान..

डोंबाळवाडी कुरबावी गावची सुकन्या विझोरी गावची सून ग्रामपंचायतीची बिनविरोध सरपंच झाली…

विझोरी (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या विझोरी ग्रामपंचायतीच्या सौ. वर्षा सोमनाथ बोरकर या बिनविरोध सरपंच पदी विराजमान झालेल्या आहेत. डोंबाळवाडी कुरबावी गावची सुकन्या विझोरी गावची सून ग्रामपंचायतीची बिनविरोध सरपंच झाली आहे…

विझोरी, ता. माळशिरस या ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. नामदेव लक्ष्मण काळे यांनी राजीनामा दिल्यानंतर सदर सरपंच पदाची निवडणूक निर्णय अधिकारी श्री. भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात निवडीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या वेळेला सौ. वर्षा सोमनाथ बोरकर यांचा एकमेव अर्ज आलेला होता. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री. नामदेव लक्ष्मण काळे, श्री. गणेश सर्जेराव काळे पाटील, सौ. सुमन बापूराव गाडे, सौ. शैला सिताराम राचकर, श्री. औदुंबर बाबा वाघंबरे, सौ. जनाबाई नामदेव शिंदे, रानुबाई पवार, छबुबाई बजरंग काळे आदी सदस्य उपस्थित होते. सौ. वर्षा सोमनाथ बोरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने मंडल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. भोसले साहेब यांनी बिनविरोध सरपंच पदाची निवडणूक जाहीर केली. यावेळेस तलाठी बी. बी. कौलगे, ग्रामसेवक श्री. शेख यांनी सहकार्य केले.

बिनविरोध सरपंच पदाची निवडणूक शंकरराव सर्जेराव काळे पाटील उर्फ के. पी., शैलेश भैय्या राचकर, बाळासो कृष्णा काळे, अंकुश सुभेदार काळे, बाजीराव काळे, गणपत काळे, बापूराव गाडे, कामेश्वर काळे, सिताराम राचकर, सचिन बोरकर, अमोल बोरकर, राजाराम बोरकर, शिवाजी वाघंबरे, करण राचकर, नवनाथ काळे, दत्तात्रय काळे, डोंबाळवाडी चे माजी सरपंच बापूराव रुपनवर, अमोल माने, रवी महानवर, सुरेश डोंबाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

बिनविरोध सरपंच पदाची घोषणा करताच उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेण्याकरता वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली…

डोंबाळवाडी कुरबावी गावचे ज्येष्ठ नेते व भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महादेवराव केसकर उर्फ मामा व डोंबाळवाडी गावच्या माजी सरपंच सौ. सुमित्रा महादेव केसकर यांच्या वर्षा कन्या आहेत. विझोरी गावामध्ये बिनविरोध सरपंच पदाचा जल्लोष करण्यात आला. त्याच पद्धतीने डोंबाळवाडी गावामध्ये केसकर परिवार यांनी सुद्धा आपल्या कन्येच्या सरपंच पदाच्या निवडीचा जल्लोष केलेला आहे. नूतन बिनविरोध सरपंच वर्षा बोरकर यांचे दोन बंधू महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये नोकरीस आहेत, त्यांनाही आपल्या बहिणीच्या निवडीने आनंद झालेला आहे…

योगायोग
सुमित्रा यांचे माहेर विझोरी आहे. त्यांना डोंबाळवाडी गावाने सुन म्हणून बिनविरोध केले होते, विझोरी गावच्या कन्येला डोंबाळवाडी कुरबावी चे सरपंच केलेले असल्याने याची परतफेड विझोरी गावाने डोंबाळवाडी गावची कन्या बिनविरोध सरपंच केलेली आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom