मा.आ. राम सातपुते यांनी भारुडकार ह. भ. प. ब्रह्मदेव केंगार यांना वाढदिवसाचे दिले गिफ्ट..

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार जिल्हास्तरीय निवड समिती बैठकीत उपस्थित राहण्याचा बहुमान मिळाला…
मांडवे (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांनी मांडवे येथील सुप्रसिद्ध भारुडकार ह. भ. प. श्री. ब्रह्मदेव अगतराव केंगार यांना वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार जिल्हास्तरीय निवड समिती बैठकीत उपस्थित राहण्याचा बहुमान मिळालेला आहे…

सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तथा सदस्य सचिव राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन समितीने मानधन सन्मान योजना जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन दि. 12/09/2025 रोजी आयोजित केलेले होते.
राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार यांना मानधन सन्मान योजनेअंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार यांची निवड करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 12/9/2025 रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदरच्या सभेत श्री. आशिष लोकरे उपायुक्त सोलापूर महानगरपालिका, श्रीम. सुलोचना सोनवणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, श्री. वामन सावळाराम बावळे शेटे वस्ती सोलापूर, श्री. सुरेश औदुंबर बेगमपुरे शेळगी सोलापूर, श्री. पंडित रघुनाथ जाधव भवानी पेठ सोलापूर, श्री. रावसाहेब (आबा महाराज) प्रकाश पाटील कुरनूर अक्कलकोट, श्री. जगन्नाथ महादेव इंगळे अकोला मंगळवेढा, श्री. ब्रह्मदेव अगतराव केंगार मांडवे माळशिरस, श्री भालचंद्र प्रभाकर राजगुरू राऊत चाळ बार्शी, श्री. नंदकुमार विश्वनाथ पाटोळे पंढरपूर, श्री. ज्योतीराम बलभीम चांगभले जुनी लक्ष्मी चाळ सोलापूर, श्री. सागर बाबा बोराटे नातेपुते माळशिरस यांच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे.

सुप्रसिद्ध भारुडकार ह. भ. प. ब्रह्मदेव अगतराव केंगार महाराज यांचा वाढदिवस दि. 13 सप्टेंबर रोजी असतो. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार यांच्या मानधन सन्मान योजनेसाठी बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा बहुमान सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे आधारवड आरोग्यदूत राम सातपुते यांनी साहित्यिक, कलाकार, सुप्रसिद्ध भारुडकार ह. भ. प. ब्रह्मदेव केंगार महाराज यांना जिल्हास्तरीय काम करण्याची संधी दिल्यामुळे सांप्रदायिक व केंगार परिवार यांच्यासह होलार समाज यांच्यामध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



