भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज राहावे – भाजप अध्यक्ष ॲड. शरद मदने…

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजप व महायुतीच्या ध्येयधोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी…
माळशिरस (बारामती झटका)
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. लवकरच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर होईल. भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज राहावे. जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका अध्यक्ष ॲड. शरद मदने यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले…

भारतीय जनता पक्ष व महायुतीचा कोणताही अजेंडा जाहीर झालेला नाही. भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. कोणत्याही निवडणुकीपूर्वी निवडणूक प्रमुख व प्रभारी यांची नेमणूक केली जाते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने भाजप व महायुतीच्या बैठकांना व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांना सुरुवात होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या पाकळ्या पांघरून कुणी भाजप महायुतीच्या नेते व कार्यकर्ते यांना चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवत असतील तर अशा भारतीय जनता पक्षाच्या संबंध नसलेल्या लोकांच्या निष्ठावान भारतीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपर्कात राहू नये.

अधिकृत भारतीय जनता पक्षाची व महायुतीची बैठक निवडणूक प्रभारी अथवा तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होतील तोपर्यंत भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये..


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



