वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची शंभरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न !

सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप होणार
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर, (ता. माळशिरस) येथील वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची शंभरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
सभेच्या प्रारंभी प्रतिमापूजन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिवंगत राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी व संस्थेचे सभासद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संस्थेचे सचिव दीपक माळवदकर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. यावेळी सोसायटीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी वर्ष साजरे करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. संस्थेचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांनी सभासदांना नफा विभागणीमधून १० टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली. हा लाभांश सभासदांच्या सेव्हिंग खात्यावर जमा करण्यात येणार असून ज्यांची खाती नाहीत त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, वेळापूर येथे नवीन खाती उघडावीत, तसेच बंद खाती असलेल्यांनी ती चालू करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले.


संस्थेच्या मयत सभासदांच्या वारसांची नावे तीन महिन्यांच्या आत नोंदवून घेण्याचा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला. सभेदरम्यान अनेक मान्यवर विषयांवर चर्चा होऊन प्रश्नांचे समाधान करण्यात आले.


या सर्वसाधारण सभेला व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे, संचालक मंडळातील आनंदराव माने देशमुख, बाळासाहेब माने देशमुख, चंद्रकांत क्षीरसागर, दत्तू तात्या माने, श्रीधर देशपांडे, अर्जुन भाकरे, विश्वजीत माने देशमुख, हरिभाऊ मेटकरी, आप्पा आडसूळ आदींसह ज्येष्ठ सभासद पांडुरंग माने देशमुख, मनोहर भाकरे, अरुण पवार, शहाजी कदम, महादेव पिसे, माणिक मदडे, देसाईकाका, राहुल माने देशमुख, शिर्के, दाजी शंकर आडत, रंगादादा माने, महादेव बनसोडे, यशवंत देशपांडे, भीमराव मेटकरी, अशोक साबळे, ज्ञानेश्वर सोनवणे, तुकाराम मगर, रामचंद्र पिसे, चंद्रकांत पिसे, उमेश बनकर, श्यामकाका कदम, चंद्रकांत आडत, विलासराव बोधले, हरिभाऊ घोरपडे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. तर शेवटी आभारप्रदर्शन व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



