माजी संचालक ॲड. श्री. दिपक पवार यांचे साखर आयुक्त पुणे यांना अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत निवेदन…

भाळवणी (बारामती झटका)
साखर आयुक्त पुणे यांना अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माजी संचालक ॲड. श्री. दिपक दामोदर पवार मु. पो. जैनवाडी ता. पंढरपूर यांनी निवेदन दिले. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. भाळवणी या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. भाळवणी ता. पंढरपूर भाडेतत्वावर / भागीदारी/सहयोगी किंवा अन्य कोणत्याही मार्गाने खाजगी उद्योजकास किंवा कोणत्याही संस्थेस चालविण्यास देण्यात येवू नये, यासाठी सदरचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी माजी संचालक ॲड. श्री. दिपक पवार, दिपक गवळी, विलास गोफणे आदी उपस्थित होते.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, मी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी लि. चा अ वर्ग ऊस उत्पादक सभासद असून कारखान्याचा माजी संचालक आहे. सहकार कायद्याप्रमाणे सप्टेंबर अखेर पर्यंत संस्थेची अधीमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणे अनिवार्य आहे. आपल्या संस्थेच्या बहुतांश सभासदांची मागणी आहे की, अधीमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेमध्ये खालील विषयाचा समावेश करावा ही विनंती.

विषय :- आपला सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. भाळवणी ता. पंढरपूर भाडेतत्वावर / भागीदारी/सहयोगी किंवा अन्य कोणत्याही मार्गाने खाजगी उद्योजकास किंवा कोणत्याही संस्थेस चालविण्यास देण्यात येवू नये.
तसेच या विषयावर आपले मत मांडण्याची संधी माझ्यासह सर्वच इच्छुक सभासदांना देण्यात यावी. सभेस साखर आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे. सदर सभेचे संपूर्ण कामकाज हे चित्रीकरण (in camera) करावे. हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण व संस्थेच्या कायमस्वरूपी भवितव्याचा असल्याकारणाने केवळ आवाजी मताने ठराव न घेता प्रत्यक्ष गुप्त मतदानाद्वारे या ठरवाबाबत निर्णय व्हावा. कारखाना प्रशासनाकडून सत्तेचा व बळाचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी.
मागील काही वर्षांपासून मोजक्याच सभासदांना सभेची नोटीस देण्यात येते व इतर सभासदांना त्यांच्या हक्कांपासुन वंचित ठेवण्यात येते. तरी संस्थेच्या सर्व सभासदांना नोटीस देण्यात यावी व सर्व सभासदांना नोटीस पोहोच झाल्याचे दफ्तर तपासून आपल्या कार्यालयाकडून खातरजमा व्हावी.
तसेच गेल्या १० वर्षांपासून संस्थेने वार्षिक अहवाल कोणत्याही सभासदाला दिलेला नाही, त्यामुळे संस्थेची कोणतीही हिशोबपत्रके सभासदांना पहावयास मिळत नाहीत. संस्थेच्या आर्थिक परिस्थितीची कसलीही माहिती सभासदांना मिळत नाही. संस्थेचा आर्थिक कारभार दडविण्याचा प्रयत्न यातून दिसतो. म्हणून सर्व सभासदांना नोटीस सोबतच वार्षिक अहवाल देखील देण्यात यावा.

तरी वरील विषय हे अतिशय गंभीर असून वरील सर्व मुद्यांबाबत आपल्याकडून तातडीने आदेश देण्यात यावेत ही विनंती, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



