शिंदेवाडी येथे शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप

शिंदेवाडी (बारामती झटका)
शिंदेवाडी, ता. माळशिरस येथे शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला.
शुक्रवार दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत शिंदेवाडी मारुती मंदिराजवळ चावडी शिंदेवाडी येथे शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. शरद (बापु) मोरे तसेच मा. जि. प. सदस्या सौ. ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये
1) मोफत हृदयरोग तपासणी (ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)
2) मोफत यूरोलॉजी तपासणी (लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)
3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप (तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)
4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मणका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया
वरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी या शिबिराचा 750 नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ. लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.
यावेळी मा. श्री. शरद (बापु) मोरे, सौ. ऋतुजाताई शरद मोरे, सुभाष रणवरे, तुषार निकम, किरण शिंदे, लतेश शिंदे, अविनाश देवकर, चेतन शिंदे, रवी मोटे, नीता झेंडे (सरपंच धर्मपुरी), शारदादेवी शिंदे (सरपंच शिंदेवाडी), छगन शिंदे, दत्ता देशमुख, हनुमंत देशमुख, प्रशांत देशमुख, चेअरमन घाडगे, सोमाबापू शिंदे, अनिल पवार, अमोल भोसले, लालासो देवकर, रणजीत देशमुख, प्रणिल देशमुख, अभिषेक देशमुख, अजय देशमुख, सुशांत पाटील, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी तसेच शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारीही उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



