ताज्या बातम्यासामाजिक

आरेवाडीच्या हिंदू बहुजन मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा – माऊली हळणवर

पंढरपूर (बारामती झटका)

सालाबादप्रमाणे याही वर्षी धनगर संस्कृतीच सोनं लुटण्यासाठी हिंदू बहुजनांचा भव्य दसरा मेळावा बिरोबा बन, आरेवाडी, ता. कवठेमंकाळ, जि. सांगली येथे दि. 30 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी आणि या दसऱ्याच्या शुभप्रसंगी विचारांचे सोने लुटण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम हिंदू बहुजनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माऊली हळणवर यांनी केले आहे.

आरेवाडीतल्या या ऐतिहासिक मेळाव्याला आपण सारे मिळून यशस्वी करूया. या मेळाव्यामध्ये धनगरी ओव्या, गजी नृत्य व बहुजन समाजातील अनेक कला या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण राज्यातील बहुजन बांधव बिरोबाचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात व आपल्या बहुमूल्य विचाराचं सोनं या ठिकाणी लुटत असतात. गाव गाड्यांमध्ये बहुजनांवर होणारा अन्याय, मेंढपाळावरील होणारे हल्ले यावरती या मेळाव्यामध्ये उहापोह होणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून या मेळाव्याची परंपरा असून या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने बहूजन बांधव उपस्थित राहत असतात. यावर्षीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान गोपीचंद पडळकर साहेबांचे कट्टर समर्थक व भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊलीभाऊ हळणवर यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वेगवेगळ्या क्लुप्त्या करून व आरोप करून त्यांचे नेतृत्व संपवण्याचे आखात आहेत. त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व बहुजन बांधवांनी उपस्थित रहावे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom