अकलूजमध्ये दसरा महोत्सवनिमित्त रावण दहन व राज्यस्तरीय गजीढोल कार्यक्रम

अकलूज (बारामती झटका)
अकलूज, ता. माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्यावतीने गुरुवार दि. २ आक्टोबर रोजी धवलश्रीराम मंदिर, धनश्रीनगर, अकलूज येथे दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने रावण दहन, सीमोल्लंघन, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फटाक्याची आतिषबाजीबरोबरच यावर्षी राज्यस्तरीय गजीढोल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांगून पंचक्रोशीतील लोकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या दसरा महोत्सवाची व त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्याची सुरुवात स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी केली असून त्यांच्या पश्चात डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी ही परंपरा कायम सुरू ठेवली आहे. त्यानुसार या वर्षीही दि. २ ऑक्टोबर रोजी येथील धनश्रीनगर मधील श्रीराम मंदिरात दसरा महोत्सवात रावण दहन, सीमोल्लंघन तसेच त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फटाक्याची आतीषबाजीचे आयोजन केले आहे.

याशिवाय यावर्षी प्रथमच महाराष्ट्राची पारंपारीक लोककला जपण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय गजीढोल कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील नामवंत गजीढोल संघांनी नोंदणी केली आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या स्पर्धा सुरू होतील. त्यासाठी खास अशा दोन मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता याच ठिकाणी रावण दहन व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फटाक्याची आतीषबाजीचे व सीमोल्लंघन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचा परिसरातील सर्वांनी आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या कार्यक्रमास गजीढोलचे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील संघाची नोंदणी झाली आहे. तरी या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



