आमदार साहेब वाट तुमची बघतोय रिक्षावाला…

पिलीव (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भाविकभक्तांच्या मनामनात श्रद्धास्थान असणारे ग्रामदैवत महालक्ष्मी देवीच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पिलीव नगरीमध्ये सातारा-पंढरपूर रोडवर महालक्ष्मी रिक्षा स्टॉप फलक तयार केलेला आहे.
महालक्ष्मी रिक्षा स्टॉप चे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते होणार आहे. शारदीय नवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात व उत्साहात पूर्ण झालेला आहे. नवरात्र उत्सव संपून आज घट उठवले जातात. परड्यांचे पूजन केले जाते. अशावेळी देवस्थानाच्या ठिकाणी भाविकभक्त व पोथ परडी असणारे लोक देवीच्या ठिकाणी जात असतात.

श्री महालक्ष्मी देवीचे ठाण पिलीव पासून ३ ते ४ किमी अंतरावर आहे. चार चाकी व दोन चाकी वाहनांवर येणाऱ्या लोकांची अडचण होत नाही. परंतु, एसटीने प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध व ज्येष्ठ महिला भाविकांना लांबचा पल्ला चालत चालत जावे लागते. यासाठी पिलीव येथील तरुणांनी एकत्र येऊन महालक्ष्मी रिक्षा स्टॉप तयार केलेला आहे. सदरच्या रिक्षा स्टॉप वर अध्यक्ष तुषार वाघमारे, उपाध्यक्ष सचिन वंजारी, सचिव अर्जुन देवकर, खजिनदार दत्ता माळी यांनी फलक तयार केलेला आहे. सदरच्या फलकावर उद्घाटक म्हणून माजी आमदार राम सातपुते यांचे नाव आहे. अद्याप उद्घाटन झालेले नाही उपस्थित असलेल्या महिला भक्तांनी काव्यात्मक उद्गार काढले, आमदार साहेब तुमची उद्घाटनासाठी वाट बघतोय रिक्षावाला असा प्रसंग घडलेला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी दोन कोटी रुपये मंजूर केलेले होते. सदरच्या निधीतून मंदिर परिसर विकसित होऊन भक्त निवासाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविकभक्त महालक्ष्मी देवीसाठी येत असतात. येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महालक्ष्मी रिक्षा संघटनेने रिक्षा स्टॉप तयार केलेला आहे.
माळशिरस तालुक्याच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये तत्कालीन लोकप्रतिनिधी राम सातपुते यांनी विकासाची गंगा आणून पश्चिम भागातील विकासाचा बॅकलॉग भरून काढला. त्यामुळे त्यांना कामाचा माणूस संबोधले जाते. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला सहज उपलब्ध होत असल्याने आपला माणूस म्हटले जाते. अडचणीतील लोकांची, अनेक दिवसांपासून शरीर व्याधीने त्रस्त असलेल्या अनेक लोकांची मोफत ऑपरेशन केल्याने जनतेने आरोग्यदूत पदवी दिलेली आहे. सर्वच क्षेत्रात राम सातपुते यांचे उल्लेखनीय कार्य असल्याने महालक्ष्मी रिक्षा संघटना यांनी सुद्धा माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते उद्घाटन ठेवलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



