तरंगफळ येथे दोन नवीन अंगणवाडी मंजूर करा – ग्रामपंचायत सदस्य गोरख जानकर

तरंगफळ (बारामती झटका)
आज बुधवार दि 1/10/2025 रोजी माळशिरस प्रकल्प आधीकारी आस्मा आतार सी. डी. पी. ओ. मॅडम व पर्यविक्षिका लोहकर मॅडम यांनी तरंगफळ येथे भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिव्यांग संघटनेचे नेते गोरख जानकर बोलत होते. तरंगफळ वार्ड क्रमांक तीन मध्ये तरंगे खोरे वस्ती तसेच जानकर वस्ती मायाका मंदिर या ठिकाणी लहान मुलांची गैरसोय होत असून त्या ठिकाणी दोन नवीन अंगणवाडी प्रस्ताव देऊन मंजुरी घ्यावी, अशी मागणी जानकर यांनी केली.
तसेच आगतराववस्ती व वगरेवस्ती जागेची अडचण होती, ती दुर झाली. इतर अंगणवाडी विषयी समाधानकारक चर्चा झाली. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे, सरपंच नारायण तात्या तरंगे, माजी सरपंच बीज उत्पादक संस्थेचे व्हाईस चेअरमन सुजित तरंगे, माजी उपसरपंच शशिकांत साळवे, आभिजित तरंगे, लाला महानवर व आंगणवाडी सेविका जे. बी. साळवे व मदतनिस बी. बी. साळवे यांचेसह अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामस्थ उपस्थीत होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



