वेळापूर येथील वर्षाराणी मदडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन…

राजमाता हॉटेल व लॉजचे मालक श्री. कल्याण मदडे यांच्या धर्मपत्नी होत्या…
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर, ता. माळशिरस येथील सौ. वर्षाराणी कल्याण मदडे यांचे वयाच्या 30 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवार दि. 05/10/2025 रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू, सासरे, दीर, जाऊ असा परिवार आहे. पुणे-पंढरपूर रोडवर राजमाता हॉटेल व लॉजचे मालक श्री. कल्याण मदडे यांच्या धर्मपत्नी होत्या. त्यांच्यावर वेळापूर-चव्हाणवाडी रोडवर राहत्या निवासस्थानाशेजारी शेतामध्ये शोकाकुल वातावरण अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांच्या रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम मंगळवार दि. 07/10/2025 रोजी सकाळी 07.00 वाजता होणार आहे.
स्वर्गीय वर्षाराणी यांचे माहेर माळशिरस तालुक्यातील जांभुड आहे. त्या महादेव खटके यांच्या कन्या होत्या. वेळापूर येथील कल्याण मदडे यांच्याशी विवाह झालेला होता. मदडे परिवार यांचा शेतीबरोबर पुणे-पंढरपूर रोडवर, वेळापूर पासून एक किलोमीटर माळशिरसच्या दिशेने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील धुमाळीच्या ठिकाणी राजमाता हॉटेल व लॉज व्यवसाय आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदडे परिवाराने शेती व हॉटेल व्यवसायातून चांगल्या प्रकारे आपला प्रपंच उभा केलेला होता.

स्वर्गीय वर्षाराणी यांचा स्वभाव मनमिळावू व कष्टाळू होत्या. दिवसभर हॉटेल व्यवसाय करून रात्री अपरात्री शेतीतील कामे करीत असत. अपार कष्टातून आपल्या संसाराचा स्वर्ग बनविलेला होता. रात्रंदिवस कष्ट व मेहनत सुरू होती. मुलीला आळंदी येथे शिक्षणासाठी ठेवलेले होते. मदडे परिवार धार्मिक व अध्यात्मिक आहे. स्वर्गीय वर्षाराणी यांच्या दुःखद निधनाने मदडे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मदडे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय सौ. वर्षाराणी यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



