जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी स्पर्धेत टिकले पाहिजेत – माजी सरपंच सुजित तरंगे

तरंगफळ (बारामती झटका)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकले पाहिजेत. क्रीडा क्षेत्रात, नवोदय परीक्षेत तरंगफळ शाळेचे विद्यार्थी चमकले पाहिजेत, असे प्रतिपादन बीज उत्पादक संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा माजी सरपंच सुजित तरंगे यांनी व्यक्त केले. तरंगफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शिक्षकांचा स्वागत समारंभ पार पडला, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नारायण तात्या तरंगे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून दिव्यांग संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख जानकर, ग्राम महसूल अधिकारी संतोष पानसरे, माजी उपसरपंच शशिकांत साळवे, सतीश कांबळे मुख्याध्यापक, श्रीमती छाया गोटे, उपशिक्षक जयवंत वाघमोडे, गणेश तरंगे, नाहीद अख्तर, अजीम चटर्जी, नितीन पाटील, नागनाथ शेटे यांचे सह नवीन शिक्षक दौलत काळे, अशपाक मुलाणी उपस्थित होते.
यावेळी गोरख जानकर म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घ्यावी. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सहकार्य करण्यात येईल. केंद्रात तरंगफळ शाळेचा एक नंबर पट असून मुले 109 व मुली 107 असून टोटल पट 216 चा आहे.

यावेळी माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी मर्यादित अकलूज तर्फे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 तरंगफळ शाळेचे उपशिक्षक श्री. गणेश जगन्नाथ तरंगे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन पाटील सर यांनी केले तर आभार वाघमोडे सर यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



