तोंडले गावचे प्रगतशील बागायतदार नामदेव कोडग उर्फ पोपट आबा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

तोंडले (बारामती झटका)
तोंडले, ता. माळशिरस गावचे प्रगतशील बागायतदार नामदेव यशवंत कोडग उर्फ पोपट आबा यांचे बुधवार दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, भाऊजय, पुतण्या 1, पुतणी 3, नातवंडं 7 असा परिवार आहे. प्राध्यापिका उर्मिला सुभाष शेंडगे स. म. महाविद्यालय अकलूज यांचे ते वडील होते. त्यांच्यावर तोंडले कोडग वस्ती या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आलेले आहे. त्यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सात वाजता होणार आहे.
कै. नामदेव कोडग यांनी त्यांच्या कारकिर्दीत सामाजिक, राजकीय, सांस्कतिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. त्यांचा सुसंस्कृत व मनमिळावू स्वभाव होता.
कै. नामदेव कोडग यांच्या दुःखद निधनाने कोडग परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कोडग परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



