प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांचे निधन

अकलूज (बारामती झटका)
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक व सध्या कोडोली, जि. कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध बी. एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील उर्फ डॉ. व्ही. आर. पाटील यांचे काल शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
अकलूजमध्ये असताना अध्यापनाच्या कामाबरोबरच ते पत्रकारिताही करत असत. एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला होता. त्यांनी अनेक विषयावर पुस्तके व वृत्तपत्रातून लिखाण केलेले आहे. एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यामध्ये अत्यंत प्रिय होते. आज माळशिरस तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात त्यांचे अनेक विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक म्हणून काम करताना आढळतात.

डॉक्टर विश्वनाथ पाटील हे अत्यंत मितभाषी व कष्टाळू होते. एक नामांकित प्राचार्य व अभ्यासू वृत्तलेखक म्हणून त्यांनी कोडोली येथेही नावलौकिक कमविला होता. अनेक दिवाळी अंकातून ते वैचारिक लिखाण करत असतात. त्यांच्या आकस्मिक निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे संस्थाचालक, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच आमचा देशमुख परिवार आणि महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली .
प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख
माजी प्राचार्य
शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज व
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ, पुणे
डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या आत्म्यास शांती लाभो व देशमुख परिवार यांना दुखातून सावरण्याचे परमेश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



