विधान परिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांची भारतीय जनता पक्षामध्ये उलट्या गिणतीला सुरुवात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था बैठकीला आ. मोहिते पाटील यांना निमंत्रण नाही, समर्थकांमध्ये जिल्ह्याची सूत्रे हाती येण्याची आवई…
पुणे (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वात आजी-माजी मंत्री, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मंडल अध्यक्ष यांच्या उपस्थितीत पुणे येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आढावा बैठक संपन्न झाली. सदरच्या बैठकीस भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांना आढावा बैठकीचे निमंत्रणच दिलेले नसल्याने भारतीय जनता पक्षामध्ये मोहिते पाटील यांच्या उलट्या गिनतीला सुरुवात झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमदार मोहिते पाटील यांना निमंत्रणच नाही मात्र, समर्थकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सूत्रे हाती येणार असल्याची आवई समर्थक देत आहेत.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व त्यांच्या समर्थकांनी पक्ष विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप माजी खासदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या होत्या. केंद्रीय व राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने गांभीर्याने दखल घेऊन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षीय कार्यक्रमांमधून जाणीवपूर्वक टाळले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटण्याची कितीतरी वेळा वेळ मागितलेली होती मात्र, मुख्यमंत्री यांनी वेळ दिलेली नाही, अशी पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या मात्र, दुसरे आमदार यांचा त्याच दिवशी वाढदिवस असताना दुसऱ्या आमदारांना शुभेच्छा दिलेल्या होत्या. यावरून आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यावर शिक्कामोर्तब झालेला होता. अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कार्यक्रमांमधून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले होते, अशी एकीकडे राजकीय परिस्थिती असताना आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सर्व सूत्रे ताब्यात येणार असल्याचे निष्ठावान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवत आहेत.

मोहिते पाटील गटातील अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत असताना त्यांना सुद्धा वेगळ्या पद्धतीने वळवण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला जात आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या निवडी केलेल्या नाहीत. त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आजी माजी मंत्री, माजी खासदार, आमदार यांच्या आजच्या आढावा बैठकीमध्ये निमंत्रण नसल्याने काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आमदारकी नंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे राजकीय भवितव्य अंधकारमय दिसत असल्याचे निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



