लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पांडुरंगाच्या नगरीत अभिष्टचिंतन सत्काराला विमानाने येणार….

‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर’ याचा प्रत्यय, आषाढी वारी पालखी सोहळ्यात वारकरी व भाविक भक्तांच्या सेवेचं फळ
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापार उद्योग व विकासाला चालना देणाऱ्या मुंबई-सोलापूर विमान सेवेचे पहिले प्रवासी देवाभाऊ ठरत आहेत. 15 आक्टोबर रोजी जयाभाऊ यांचा वाढदिवस आहे. लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पांडुरंगाच्या नगरीत देवाभाऊ अभिष्टचिंतन निमित्त जयाभाऊ यांचा सन्मान करतील. “जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर” याचा प्रत्यय आषाढी वारी पालखी सोहळ्यात हायटेक नियोजन करून वारकरी व भाविक भक्तांच्या सेवेचे फळ मिळणार असल्याची भावना सर्वसामान्य जनतेची व भाविक भक्तांची झालेली आहे.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्याचे हटके नियोजन केलेले होते. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र योजनेअंतर्गत एकाच छताखाली निवारा कक्ष, चरण सेवा, आरोग्य सुविधा, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, शौचालय, स्नानगृह, चार्जिंग स्टेशन अशा सुविधा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या होत्या..
ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण व्हावे, भाविकांना व वारकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ मंडप, सर्व गावांमध्ये ठिकाणे दर्शक फलक, सेवा दर्शक फलक लावण्यात येत असल्याने पालखी सोहळ्यातील दिंडीकरी, वारकऱ्यांबरोबरच टँकर भरणाऱ्या वाहनांना सहज माहिती उपलब्ध होत होती. पालखीसोबत चालणाऱ्या वारकऱ्यांना, दिंडीमधील वारकऱ्यांना व सोबत असणाऱ्या वाहनांना प्रत्येक गावात आपले मुक्कामाचे ठिकाण, पाणी भरण्याचे ठिकाण, आरोग्य कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी शोधण्यास अवघड जाते. परंतु, यावर्षी जिल्हा परिषदेने ठिकठिकाणी टँकर भरणा केंद्र, पालखी विसावा व वारकरी सुविधा केंद्र, पालखीतळ, गोल रिंगण आदींबाबत फलके लावली आहेत. त्याचबरोबर सर्वत्र पावसाळी हवामान असल्याने पाऊस आल्यानंतर वारकऱ्यांना निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी ठिकठिकाणी यावर्षी प्रथमच वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेले होते. आषाढी वारी हायटेक वारी झालेली होती. भाविकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नियोजनाचे कौतुक केलेले होते. वैष्णव व भाविक भक्तांचा आशीर्वाद म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रथमच मुंबई-सोलापूर विमान सेवेने प्रवास करून जयाभाऊ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पांडुरंगाच्या नगरीत सत्कार करतील. ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’ याचा प्रत्यय अनुभवयास मिळालेला आहे..

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांना वाढदिवसाच्या बारामती झटका परिवार यांचेकडून लाख लाख शुभेच्छा… भाऊ आपणांस उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो. व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस साकडे आपल्या हातून सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची सेवा अशीच घडत राहो, हीच सदिच्छा. आपला हितचिंतक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील, मु. पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर धन्यवाद….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



