राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुकाध्यक्षांचं डोकं ठिकाणावर आहे का ? – अध्यक्ष सुनीलजी गोरे

बॅनरबाजीच्या नशेत स्वाभिमान आणि सन्मान दोन्ही हरवले आहेत ?
फोंडशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचं राजकारण आज एका वेगळ्या वळणावर उभं आहे. एका बाजूला मा. आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रयत्नांतून २०१९ ते २०२४ या काळात न्यायालयाची भव्य इमारत, माळशिरस विश्रामगृह, विविध रस्ते व शासकीय योजना पूर्णत्वास जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला काहीजण या कामांचं श्रेय घेण्यासाठी राजकीय नाटकं उभारतायेत, बॅनरबाजी करतायेत, अशी खोचक टीका भारतीय जनता पक्ष नातेपुते मंडल ओबीसी सेल अध्यक्ष सुनीलजी गोरे यांनी केलेली आहे.
पुढे बोलताना अध्यक्ष सुनीलजी गोरे म्हणाले, सदरची कामे मंजूर झाली त्या वेळेला मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होतो. आश्चर्य म्हणजे हे की, आज या गोष्टींचा कहर झाला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या तालुकाध्यक्षाने भारतीय जनता पार्टीचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा फोटो आपल्या बॅनरवर लावला.
शरद पवार गटाचा तालुकाध्यक्ष भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरतोय, ही गोष्ट राजकारणातील ढोंगपणाचं जिवंत उदाहरण आहे. पण त्यांचा नाईलाज आहे. ते कोणाच्या तरी ताटाखालच मांजर आहे, त्यामुळे त्यांची इच्छा नसताना हे त्यांना करायला भाग पाडलं जात आहे. यातून विरोधक किती वैफल्यग्रस्त आहेत हे दिसतच आहे. तसेच जनतेला फसवणे व दिशाभूल करणे हा या काळू-बाळू कंपनीचा एककलमी कार्यक्रम यातून स्पष्ट दिसतं आहे.
जे लोक कालपर्यंत पक्ष्याच्या विरोधात काम करत होते, देवेंद्रजींवर, भाजपवरती टीका करत होते, तेच आज त्यांचे फोटो वापरतायेत. भाजपविरोधात काम करून आता भाजपच्या नेतृत्त्वाची बॅनरबाजी म्हणजे तालुक्यातील जनतेने आता ओळखून जावे, काय अवस्था या प्रस्थापित कंपनीची झाली असेल.
तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. निवडणुकीत विरोधात काम करायचं आणि कुठ भाजप मंत्री आले की नव्या नवरी पेक्षा नटुन, किंमत देत नाहीत तरी पुढं-पुढं करायचं हा धंदा यांचा चालला आहे. निष्ठा, विचार, तत्त्व हे कोणत्या बाजारात विकून आलेत हे यांचं यांनाच माहीत !
एकेकाळी राज्याच्या राजकारणाच्या गप्पा हाणणारे हे प्रस्थापित कुटुंब, परंतु आज एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पोरान, संघर्षशील नेतृत्व रामभाऊ सातपुते यांनी तुमची पळता भुई थोडी केलीय, हे आता तुम्हीच दाखवून दिलंय.
असली खोटी बॅनरबाजी करण्यापेक्षा, आपल्यावरती एवढी वाईट वेळ का आली आहे, याचं कुठ तरी आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे, असा टोला भारतीय जनता पार्टी नातेपुते मंडल ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुनीलजी गोरे यांनी लगावलेला आहे.
टीप – अशा प्रकाराला जनता शुध्द बावळटपणा म्हणते हे लक्षात ठेवा.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



