ताज्या बातम्याशैक्षणिक

सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या मैत्री स्नेहमेळाव्याचे आयोजन

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर, ता. माळशिरस येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सदाशिवनगर या शाळेतील २००७-०८ च्या बारावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या मैत्री स्नेहमेळाव्याचे आयोजन दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज सदाशिवनगर येथे करण्यात आले आहे. तब्बल १७ वर्षांनी २००७-०८ च्या बॅचमधील इयत्ता बारावीचे विद्यार्थी स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत.

नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, शाळेतील दिवसात रमण्यासाठी सर्वजण एकत्र येणार आहेत. यावेळी दीक्षित सर, जाधव सर, जावळे सर, कदम सर, पोपट निंबाळकर सर, प्राचार्य निंबाळकर सर आदी शिक्षक उपस्थित राहणार आहेत.

तरी या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom