दोन नाती, एकीने एमपीएससी, दुसरीने नॅशनल क्रीडा क्षेत्रात नाव कमवले

तरंगफळ (बारामती झटका)
ज्येष्ठ विधीज्ञ शांतीलाल उत्तमराव तरंगे यांची नात रोशनी अशोक काळे हुलगे यांची कालवा निरीक्षक जलसंपदा विभाग बुलढाणा येथे निवड होऊन नंतर एमपीएससी उत्तीर्ण होऊन महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल तसेच दुसरी नात कु. आयुश्री उर्फ ख़ुशी संजय तरंगे यांनी दिल्ली येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या फेनेस्टा लॉन टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्रातील फक्त पाच मुलींमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तरंगफळ ग्रामस्थ ग्रामपंचायत यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ॲड. शांतीलाल उत्तमराव तरंगे, सरपंच नारायण तात्या तरंगे, दिव्यांग संघटनेचे नेते गोरख जानकर, माजी सरपंच महादेव तरंगे, प्राध्यापक अमोल तरंगे सर, प्राध्यापक संजय तरंगे, अशोक काळे, सुनीता काळे, सुमन तरंगे, सचिन हुलगे, शशिकांत साळवे, भगवान तरंगे, विलास तरंगे, प्राध्यापक सुहास तरंगे, माजी सरपंच व महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेत्या सौ. रत्नमाला तरंगे, सुजित तरंगे यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुकतीच रोशनीला पोलीस आयुक्तालय कार्यालय आकुर्डी, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी नियुक्ती मिळाली असून आयुश्री औरंगाबाद येथे होणाऱ्या नॅशनल लॉन टेनिस स्पर्धेची तयारी करीत आहे. या दोघींनाही ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



