पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत माळशिरसचे माजी नगराध्यक्ष सचिनआप्पा वावरे यांचा भाजप प्रवेश….

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी शनिवार दि. 25/10/2025 रोजी भाजप व महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांचा दीपावली स्नेह मेळाव्याचे आयोजन नातेपुते येथील मधुर मिलन मंगल कार्यालयामध्ये केले होते. सदरच्या कार्यक्रमांमध्ये अनेक नेते व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. त्यामध्ये माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीत धुमाकूळ घातलेल्या साई बैलाचे मालक बैलगाडी मालक युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह वाजत गाजत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. माजी नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे यांच्या भाजप प्रवेशाने भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे..

माळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये लढत झालेली होती. समाजसेविका सौ. ताई सचिन वावरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. सचिन आप्पा वावरे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता मात्र, राजकीय घडामोडी व उलथापालथ होऊन राष्ट्रवादीचे सचिन आप्पा वावरे व भाजपचे उमेदवार व इतर अपक्ष यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज काढून घेतल्याने माळशिरस नगरपंचायतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बिनविरोध होण्याचा बहुमान सौ. ताई सचिन वावरे यांना मिळालेल्या होता.


युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे यांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा केलेली होती. अडीअडचणीत मदत केलेली होती, त्यामुळे नगरसेवक बिनविरोध होण्याचा बहुमान मिळालेला होता.
माळशिरस नगरपंचायतीमध्ये भाजप व राष्ट्रवादी यांची युती होऊन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या कार्यकालाचा फॉर्म्युला ठरलेला होता. यामध्ये अपक्ष सौ. ताई सचिन वावरे यांना बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा सुद्धा बहुमान मिळालेला होता.
युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे यांनी बिनविरोध नगरसेवक व बिनविरोध नगराध्यक्ष मिळालेल्या संधीचे सोने करून वार्डापुरते कार्य न ठेवता संपूर्ण माळशिरस शहरामध्ये आपल्या कार्यातून ठसा उमटवलेला आहे.

युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे यांनी माळशिरस शहरांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम घेऊन समाजामध्ये आपली कार्यातून वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा साई बैलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुपरीचित आहेत.
सचिन आप्पा वावरे यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह फुलविण्यासाठी माळशिरस शहर व तालुक्यामध्ये निश्चितपणे फायदा होईल.

पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते यांनी सचिन आप्पा वावरे यांना भाजपमध्ये पक्ष प्रवेश दिल्यानंतर उपस्थितीत जनसमुदाय यांनी टाळ्यांचा कडकडाट करून भाजप प्रवेशाला दाद दिलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



