वारकरी आचारसंहिता परिषदेच्या तालुकाप्रमुख पदी पोपट जमदाडे यांची नियुक्ती

माळशिरस (बारामती झटका)
वै. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ आळंदी (देवाची) द्वारा संचलित वारकरी आचार संहिता परिषद महाराष्ट्र राज्यच्या माळशिरस तालुका प्रमुख पदी पोपट जमदाडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्रही पोपट जमदाडे यांना देण्यात आले आहे.
सदर नियुक्तीपत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रयोगी तपस्वी संत प. पू. आचार्य स्वामी श्री गोविन्ददेव गिरीजी महाराज यांच्या प्रेरणा व प्रत्यक्ष आशिर्वचनाने वारकरी संप्रदायाच्या मुख्य प्रवाहात संप्रदायाची सेवा करण्यासाठी वारकरी आचारसंहिता परिषद कटिबद्ध आहे. धर्म रक्षावया साठी आणि करण्यासाठी आम्हांसी या तत्वाप्रमाणे परिषदेचा महाराष्ट्रभर संघटनविस्तार होत आहे.

माळिशरस तालुकाप्रमुख पदी श्री. पोपट जमदाडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! जयतू भारतम् इति रामकृष्णहरिविठ्ठलकेशव.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



