फलटण तालुक्याची महाराष्ट्रात बदनामी करण्याचे षडयंत्र करणाऱ्याचा जाहीर निषेध – भाजप अध्यक्ष अमित रणवरे

फलटण शहर व तालुक्याचा विकास जोमाने होत असल्याने जनाधार संपत चाललेल्या नेत्यांची अधोगतीकडे वाटचाल…
फलटण (बारामती झटका)
फलटण तालुक्यात चार दिवसांपूर्वी घडलेली दुर्दैवी घटना ही अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलीस प्रशासनाने अटक केली आहे. चौकशी सुरू झाली आहे. हे प्रकरण निश्चित कशामुळे झाले आहे, याचे उलगडे होऊ लागले आहेत.
परंतु, फलटण तालुक्याची संपूर्ण महाराष्ट्रात बदनामी करण्याचे षडयंत्र रचनाऱ्यांचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो.
सदर प्रकरणी चुकीच्या पद्धतीने त्या प्रकरणांमध्ये कोणाचीही नावे घेऊन जी बदनामी सुरू आहे ती अतिशय निंदनीय आहे. जे कोणी आरोपी असतील किंवा त्यामध्ये जे समाविष्ट असतील त्यांच्यावर कारवाई निश्चित व्हावी आणि कडक व्हावी. परंतु, राज्यातीलही अनेक नेते आपल्या फलटणच्या कर्तुत्ववान सुपुत्रावर म्हणजेच आदरणीय माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आदरणीय आमदार श्री. सचिन पाटील यांच्यावरती कशाही पद्धतीची टीका टिप्पणी करत आहेत, ही फलटणच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी बाब आहे आणि जी माहिती, ही अत्यंत चुकीची आहे ती माहिती फलटण मधून पुरवली जात आहे. जे पुरवत आहेत त्यांचाही जाहीर निषेध.
आपल्या फलटणची संस्कृती अतिशय चांगल्या प्रकारे आहे परंतु, त्याला डाग लावण्याचे काम जे करतायेत त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची जागा फलटणकर जनता निश्चितपणे दाखवणार आहेत. ज्या नेतृत्वाने आपल्या फलटण तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून दिले, आपल्या भागात रेल्वे जंक्शन व्हावं, फलटण तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, रेल्वेच्या माध्यमातून फलटण तालुक्याचा कायापालट होणार आहे. नाईकबंबवाडी एमआयडीसी लवकरच सुरू होणार आहे. धोमबलकवडी कॅनॉल बारमाही झाला आहे. फलटण तालुक्याला जिल्ह्याच्या सर्व सुख सोयी देणारं नेतृत्व म्हणजेच आदरणीय माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि यामुळेच फलटणचा विकास होत आहे. फलटण तालुक्याला जोडणारे सर्व रस्ते कॉंक्रिटीकरणाचे तसेच मोठे झालेले आहेत याचे श्रेय फक्त आदरणीय दादांना आहे.
या फलटण तालुक्यात शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळत नव्हता. ऊस वेळेवर कारखान्याला जात नव्हता आणि अशा परिस्थितीत आदरणीय दादांनी कोणाचाही एक रुपया न घेता स्व कर्तुत्वावर स्वराज कारखाना उभारला. तेव्हापासून आजपर्यंत फलटण तालुक्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना हा स्वराज कारखाना आहे. परंतु, त्या कारखान्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांचाही जाहीर निषेध.
काल फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये अनेक विकासकामांचा भूमिपूजन सोहळा, अनेक विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्या सोहळ्याला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातून प्रत्येक वाडी वस्त्यातून जनता जनार्दन दादांना आशीर्वाद देण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहिली आणि हेच विरोधकांना खूपत आहे.
फलटण तालुक्यातील जनता माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागली. फलटणचा विकास व्हायला लागला आणि विरोधकांचा सुपडा साफ होयला सुरुवात झाली आणि त्यामुळेच आता त्यांच्याकडे विकास कामांवर बोलायला काहीच नाही. म्हणून परवा घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये आदरणीय दादांचं नाव जाणीवपूर्वक वापरलं गेलं. परंतु, त्यांचा त्या घटनेची दुरान्वये संबंध नाही. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा जाहीर निषेध. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधव, सर्व महिला भगिनी, सर्व युवा वर्ग, कष्टकरी हे सर्व आदरणीय दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहेत.
आदरणीय दादा आणि आदरणीय आमदार साहेब आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निर्भीडपणे पुढे चला. आपल्या पाठीशी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनता जनार्दन तुमच्या सोबत आहे.
धन्यवाद
आपलाच
श्री. अमित रणवरे
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी फलटण तालुका पश्चिम
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



