ताज्या बातम्याराजकारण

आली रे आली आता आमची बारी आली, अकलूज नगर परिषद राम सातपुते यांच्या ताब्यात देण्याची वेळ आली…

केंद्रात व राज्यात भाजप महायुतीचे सरकार असल्याने प्रस्थापितांनी जनतेला विकासापासून कोसो दूर ठेवल्याने जनता भाजपचे कमळ हाती घेणार….

अकलूज (बारामती झटका)

आशिया खंडात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अकलूज ग्रामपंचायत समजली जात होती. अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन प्रथमच नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. केंद्रात व राज्यात भाजप महायुतीचे सरकार असल्याने प्रस्थापितांनी जनतेला विकासापासून कोसो दूर ठेवल्याने जनता भाजपचे कमळ हाती घेऊन आली रे आली, आता आमची बारी आली, अकलूज नगर परिषद राम सातपुते यांच्या ताब्यात देण्याची वेळ आली, अशी सर्वसामान्य, गोरगरीब, पीडित, वंचित, शोषित जनतेमधून बोलले जात आहे.

अकलूज ग्रामपंचायतीवर कायम प्रस्थापितांची सत्ता राहिलेली आहे. पूर्वी अकलूज हे माळशिरस तालुक्यामध्ये व्यापारी, उद्योग, व्यवसाय व दळणवळणाचे गाव म्हणून प्रसिद्ध होते. अकलूज शहरात आत्तापर्यंत गल्लीबोळामध्ये म्हणावा असा विकास झालेला नाही. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला नाहक त्रास सोसावा लागत आहे.

प्रस्थापितांनी गावातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला नेहमी त्रास दिलेला आहे. आपापसांत भांडण लावणे, गरिबांवर अन्याय करणे, गोरगरिबांच्या कवडीमोल किमतीवर भूखंड व जमिनी लाटणे, कारखाना, पतसंस्था, बँका यांच्यामार्फत खातेदारांची पिळवणूक करून जनता गरीबच राहून आपण गलेलठ्ठ कसे होईल, याकडे कायम लक्ष दिले आहे.

माळशिरस तालुक्यात प्रस्थापितांना शह देण्याकरता कोणीच वाली नव्हता. तालुक्यातील नकली विरोधक स्वतःचा स्वार्थ साधून घेऊन जनतेला होरपळत ठेवत होते.
माळशिरस तालुक्याला आमदार राम सातपुते यांच्या रूपाने गोरगरीब व सर्व सामान्य जनतेचा तारणहार असणारा लोकप्रतिनिधी मिळाला आणि खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्याचा सत्तर वर्षांमध्ये रखडलेला विकास झालेला आहे.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये राम सातपुते यांनी आपल्या कार्यकाळामध्ये भरपूर विकास केलेला आहे. तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जाणीवपूर्वक विकास करून दिलेला नाही. अकलूज शहरांमध्ये ठराविक रस्ते सोडले तर इतर रस्त्यांची दयनिय अवस्था आहे. प्रस्थापितांच्या बगलबच्चांच्या नावे प्लॉटिंग करून सदरच्या ठिकाणी प्लॉट विक्रीसाठी दर्जेदार रस्ते व गटारी तयार केल्या जातात. मात्र, लोकवस्तीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आणि गटारी तुंबल्यामुळे दुर्गंधी येवून आरोग्य धोक्यात आहे, अशी अवस्था अकलूजची आहे.

आरोग्यदूत राम सातपुते यांच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या छतावर नाचण्याकरता आपला हक्काचा माणूस मिळालेला असल्याने अकलूज माळेवाडी नगर परिषद हद्दीमध्ये निवडणूक कधी सुरू होते आणि भाजप व महायुतीच्या उमेदवारांना कधी मतदान करतोय, अशा पद्धतीची ओढ लागलेली आहे. ज्याप्रमाणे आषाढी वारीच्या वेळेला श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह अनेक महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून पालख्या पायी वारी करीत मजल दर मजल करीत येत असतात. त्या वेळेला पांडुरंगाच्या दिशेने वारकरी व भाविक भक्तांची पावले चालत असतात. त्याच पद्धतीने मतदानाच्या वेळी सुद्धा सर्वसामान्य व पिडीत जनता कमळाला मतदान करण्याकरता आसुसलेली आहे. नगरपंचायत हद्दीतील मतदार उघड उघड बोलत आहे, आली रे आली आता आमची बारी आली, अकलूज नगर परिषद राम सातपुते यांच्या ताब्यात देण्याची वेळ आली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom