वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सोमनाथशेठ जाधव

वडूज (बारामती झटका)
राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार वडूज नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे यांनी सहा महिने नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळून गेल्या सहा महिन्यात वडूज शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन कोट्यावधी रुपयांची विकासकामे ग्रामविकास मंत्री नामदार मा. श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून आपला कार्यकाळ पूर्ण करून दिलेल्या राजीनाम्यानंतर आज उपनगराध्यक्ष पदी श्री. सोमनाथशेठ जाधव वडूज नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले.

नगराध्यक्ष पदाची पुढील निवडणूक होईपर्यंत किंवा नवीन नगराध्यक्ष निवडून येईपर्यंत श्री. सोमनाथशेठ जाधव नगराध्यक्षपदाची जबाबदारी पार पडणार आहेत.
या पदग्रहण सोहळ्यास भारतीय जनता पार्टी खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा सरचिटणीस विकल्पशेठ शहा, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजयशेठ शितोळे (सरकार), नगरसेवक सचिन माळी, धनंजय काळे, नगरसेवक बनाजी पाटोळे सर, नगरसेवक श्रीकांत काळे, कार्यकारी नगरसेवक प्रतीक बडेकर, नगरसेवक ओंकार चव्हाण, डांबेवाडी गावचे सरपंच पै. किशोर बागल, आकाश जाधव पत्रकार शरद कदम, नितीन राऊत, आयाज मुल्ला, शेखर जाधव लालासाहेब माने, विनोद लोहार, निलेश जाधव, सनी जाधव, राजू जाधव आदी मान्यवरांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने नगरपंचायत या ठिकाणी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



