शंकरराव यादव राष्ट्रीय स्नेहबंध शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित!

श्रीपूर (बारामती झटका)
श्रीपूर, ता. माळशिरस येथील आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट शैक्षणिक संकुलातील श्री चंद्रशेखर विद्यालय, प्राथमिक विभागाचे उपमुख्याध्यापक शंकरराव यादव यांना स्व. हरिश्चंद्र फौंडेशन व निसर्गाश्रम प्रकल्प महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित शानदार समारंभात राष्ट्रीय स्नेहबंध शिक्षक रत्न पुरस्कार देऊन फौंडेशन चे अध्यक्ष कृष्णात गायकवाड व वाशीमचे फौंडेशन सदस्य व आदर्श शिक्षक जमीर शेख यांचे हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मंचावर जि. प. सदस्य बाळासाहेब देशमुख, विवेक वर्धनी पंढरपूर चे प्राचार्य उत्तरेश्वर मुंढे, डॉ. देविदास फाळके, ॲड. दत्तात्रय सरडे, वृत्तसंपादक भारतकुमार मोरे, श्रीकांत कांबळे, कलाध्यापक संघांचे हाक्के सर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
शंकरराव यादव यांनी गेली 35 वर्षे शिक्षण सेवा पूर्ण केली. शैक्षणिक सेवा काळात विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड, राज्य मुख्यालय मुबंई अंतर्गत लीडर ट्रेनर म्हूणन ते कार्य करीत असून सध्या सोलापूर जिल्हा ट्रेनिंग कमिशनर स्काऊट या पदावर कार्यरत आहेत. स्काऊट-गाईड च्या माध्यमातून शाळेचे 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहचविले आहे. राष्ट्रीय सुवर्णबाण पुरस्कार नवी दिल्ली च्या माध्यमातून अनेक विद्यार्थी राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचविले आहेत. संपूर्ण भारत देशातील विविध राज्यात राष्ट्रीय स्टाफ म्हणून कार्य केले आहे. ढाका, बांगलादेश येथील आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात भारत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
जिल्हा, राज्य व राष्ट्रीय बेस्ट स्काऊटर पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्याबरोबर अविष्कार फौंडेशन, संस्कार प्रतिष्ठान, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान, कामधेनू सेवा प्रतिष्ठान, रोटरी क्लब, लायन्स क्लब, अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. रक्तदान, वृक्षारोपण, समाजसेवा, पूरग्रस्त, भूकंप ग्रस्त, त्सुनामी ग्रस्त यांना मदत कार्य केले. अनेक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, गीतसंगम, संस्कार- संस्कृती, सुविचार सुमने, चला जाऊ पर्यटनाला, कब चा यशोदीप, ज्ञानामृतकुंभ ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक शिक्षक प्रशिक्षण कार्यात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जिल्हा व राज्य, राष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन केले आहे.
या कार्याचा आढावा घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. हा मानाचा राष्ट्रीय स्नेहबंध शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉ. रामदास देशमुख, उपाध्यक्षा शुभांगीताई देशमुख, संचालक यशराज देशमुख, सचिव भारत कारंडे, जिल्हा स्काऊट कार्यालयाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



