मोफत महाआरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन….

शिवप्रसाद फाउंडेशन व सेवा सदन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन….
माळशिरस (बारामती झटका)
शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. शरदबापू मोरे व शिवप्रसाद अर्बन बँकेच्या चेअरमन तथा सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. ऋतुजाताई शरद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रसाद फाउंडेशन व सेवा सदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
सदरच्या शिबिरामध्ये मोफत हृदयरोग तपासणीत इसीजी, ॲजिओग्राफी, ॲजीओप्लास्टी, मोफत यूरोलॉजी तपासणीत लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप, तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण पापणी पडलेले – रेटीना, मेंदूचे आजार, तपासणी व मोफत शस्त्रक्रिया मोफत कॅन्सर तपासणी अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत रक्त तपासणी, मणका व मज्जातंतू या संबंधी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

सदर कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि. 30/10/2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 03 वाजेपर्यंत श्रीनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज, माळशिरस, शिक्षक कॉलनी, म्हसवड रोड, माळशिरस, शुक्रवार दि. 31/10/2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 03 वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय पिलीव ता. माळशिरस, शनिवार दि. 01/11/2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 03 वाजेपर्यंत अकलाई देवी मंदिराशेजारी अकलाई मंगल कार्यालय अकलूज, रविवार दि. 02/11/2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 03 हनुमान मंदिर आंबेडकर चौक श्रीपुर ता. माळशिरस, सोमवार दि. 03/11/2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 03 वाजता जुने बस स्टॅन्ड दुर्गादेवी मंदिर माळीनगर ता. माळशिरस, येथे मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. यासाठी रोहन कोरटकर 91 72 57 39 21, सुशांत पाटील 98 60 91 5001, शिवप्रसाद फाउंडेशन 95 52 59 49 50 या नंबर वर संपर्क साधावा. टीप दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी शिवप्रसाद अर्बन बँक शेजारी नातेपुते या ठिकाणी शिबिर घेण्यात येईल. याची तालुक्यातील सर्व गोरगरीब व गरजू लोकांनी नोंद घ्यावी, असे शिवप्रसाद फाउंडेशन व सेवा सदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



