क्रीडाताज्या बातम्याशैक्षणिक

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा संघ विजेता

सोलापूर (बारामती झटका)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तथा सोलापूर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सोलापूर येथे दि. २७ व २८ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे.

तसेच एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या विजेत्या संघातील खेळाडू अनुष्का चाकूर, संजना बाड, श्रद्धा महाडिक, आर्या कुलकर्णी आणि ज्ञानेश्वरी फावडे यांची अहिल्यानगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्या सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज देत तृतीय क्रमांक मिळवला. मुलांच्या या संघात पारस शेठ, पार्श्व देशमाने, कृष्णा जाधव, अथर्व चव्हाण व वेदांत सोनटक्के यांचा समावेश होता. त्यातील पारस शेठ याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यावेळी क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड व पंच हर्षद शेख उपस्थित होते. मुख्याध्यापिका शिबानी बॅनर्जी, प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ यांनी विजेत्या संघाचे व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom