अकलूज नगर परिषद निवडणूकीत शिवरत्नवरील मोहिते पाटील यांच्या प्रतिष्ठेची तर भाजपच्या अस्तित्वाची निवडणूक आहे…

महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये अकलूज नगर परिषदेची निवडणूक लक्षवेधी ठरणार…
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये प्रथमच अकलूज नगर परिषदेची निवडणूक होत असल्याने लक्षवेधी ठरणार आहे. अकलूज नगर परिषद निवडणुकीत शिवरत्न वरील मोहिते पाटील यांच्या प्रतिष्ठेची तर भाजपच्या अस्तित्वाची निवडणूक होणार आहे..
अकलूज ग्रामपंचायत आशिया खंडात सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जात होती. मोहिते पाटील यांचे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून एक हाती वर्चस्व होते. अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होण्याकरता ग्रामस्थांनी साखळी उपोषण केलेले होते. अकलूज ग्रामपंचायतचे नगरपरिषदमध्ये रूपांतर होऊन जवळजवळ दोन वर्षाचा कालावधी लोटलेला होता तरीसुद्धा निवडणूक जाहीर झाली नव्हती. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असून नगर परिषदेने सुरुवात झालेली आहे. अकलूज नगर परिषद निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
मोहिते पाटील घराण्यात भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत. सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक रणजीतदादांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा केलेली होती. मोहिते पाटील अकलूज नगर परिषद कोणत्याही पक्षाकडून अथवा आघाडी करून लढत भाजपने मात्र कमळावर तयारी सुरू केलेली आहे.
महाराष्ट्र राज्याचे लाडके कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी अकलूज नगर परिषद निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर लढवण्याची तयारी पूर्ण केलेली आहे.
अकलूज शहरामध्ये भारतीय जनता पक्षाने अनेक शाखा काढून संघटन केलेले आहे. भाजपचा कार्यकर्ता प्रत्येक घरात निर्माण झालेला आहे. भाजपचे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे व तालुका संघटक डॉक्टर निलेश ननवरे यांनी अकलूज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व टिकवून ठेवलेले होते. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना अडचणीमध्ये मदत करण्याची भूमिका कायम ठेवलेली आहे. अनेक महिलांना विमानाने देवदर्शन घडवून आणलेले आहे. राम सातपुते यांनी अकलूज शहरातील अनेक समस्या व नागरिकांच्या अडचणी वेळोवेळी दूर केलेल्या आहेत. त्यामुळे अकलूज शहरातील सर्वसामान्य नागरिक व व्यापारी भाजपकडे आकर्षित झालेला आहे.
मोहिते पाटील यांच्याकडे अकलूज ग्रामपंचायत स्थापनेपासून एक हाती सत्ता होती तरीसुद्धा सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न भेडसावत आहेत. पीडित जनता परिवर्तनाची वाट पाहत होते मात्र, त्यांना परिवर्तनाची दिशा सापडत नव्हती. राम सातपुते यांच्या माध्यमातून अकलूजच्या वंचित व पीडित जनतेला आशेचा किरण सापडलेला आहे. अकलूज शहरांमध्ये कितीतरी प्रभाग विकासापासून कोसो दूर आहेत. तरीसुद्धा जनता दबावाखाली सहन करत होती. खमक्या विरोधक मिळत नव्हता. राम सातपुते यांच्या रूपाने अकलूजकरांना वाली मिळालेला आहे. भारतीय जनता पक्षाची केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने अकलूज गावचा विकास करायचा असेल तर सत्तेच्या पाठीमागे जनता जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फत्तेसिंह माने पाटील, शशिकांत माने पाटील यांच्यासह अनेक माने पाटील व माने देशमुख यांनी भेट घेऊन राजकीय रणनीती ठरवलेली असल्याने अकलूज नगर परिषदेमध्ये फायदा होणार आहे.
माळशिरस तालुक्याचे धाडसी व परिवर्तनवादी माजी आमदार स्वर्गीय शामराव पाटील पानीव त्यांच्या कुटुंबातील प्रकाशबापू पाटील, श्रीलेखा पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. पानीवच्या पाटील कुटुंबीयांचाही अकलूज नगर परिषदेमध्ये मोठा फायदा होणार आहे. मेडिकल हब व व्यापारी यांच्याशी असणारा सलोखा निवडणुकीत चांगलाच उपयोगी येणार आहे.
अकलूजकरांना विकास करणारा व खमक्या प्रतिनिधित्व करणारा विरोधक करणारा लोकप्रतिनिधी मिळत नसल्याने जनता गपगुमान सहन करत होती. आता मात्र राम सातपुते यांच्या रूपाने हक्काचा माणूस मिळालेला असल्याने अकलूज शहरातील अंडर करंट सर्वकाही सांगून जात आहे. शेवटी निवडणूक आहे मात्र, अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा तर भाजपच्या अस्तित्वाची निवडणूक होणार आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



