विभागीय स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या मुलींचे यश

वाखरी (बारामती झटका)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धा अहिल्यानगर जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये नुकत्याच संपन्न झाल्या.
या स्पर्धेत वाखरी, पंढरपूर येथील माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या संघात अनुष्का चाकूर, संजना बाड, श्रद्धा महाडिक, आर्या कुलकर्णी व ज्ञानेश्वरी फावडे या खेळाडूंचा समावेश होता.

यावेळी प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ, हेड मिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी, क्रीडा शिक्षक प्रवीण पिसाळ यांनी संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



