ताज्या बातम्याराजकारण

अकलूजमधील प्रस्थापितांची गुंडगिरी दडपशाही मोडून काढून भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

अकलूज नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी होते हीच परिवर्तनाची नांदी आहे – महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे

अकलूज (बारामती झटका)

अकलूज, ता. माळशिरस येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी अकलूज नगर परिषद निवडणुकी संदर्भात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. विशेष म्हणजे अकलूज ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी उदंड प्रतिसाद मिळाला. आज अकलूजमध्येही मोठ्या प्रमाणात भाजपकडून उमेदवारी मागण्यासाठी होणारी गर्दी हीच परिवर्तनाची नांदी असल्याचे सांगून अकलूजकरांना येथील व्यापारी, डॉक्टर, सर्वसामान्य जनता, गोरगरीब मतदार या सर्वांना आम्ही प्रस्थापितांच्या जुलमी राजवट दडपशाही व गुंडगिरी मोडीत काढून भयमुक्त अकलूज करण्याचा विश्वास उपस्थित इच्छुक उमेदवारांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत, अकलूज नगर परिषदेचे निवडणूक प्रभारी आनंदराव राऊत, भाजपचे अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे त्यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष श्री. अशोकदादा गायकवाड, माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष श्री. राहुल ढेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकलूज शहर अध्यक्ष श्री‌ राजाभाऊ गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकलूज शहर उपाध्यक्ष श्री. सुनील गायकवाड यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom