ताज्या बातम्याराजकारण

वृद्ध लोककलावंत मानधन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी नवनियुक्ती सदस्यांनी प्रयत्न करावेत – बाळासाहेब सरगर

जाधववाडी (बारामती झटका)

रविवार दि. 9 नोव्हेंबर रोजी भगवंत मंगल कार्यालय, जाधववाडी या ठिकाणी वृद्ध कलाकार चा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला तमाशा कलावंत, भजनी कलावंत, वाजंत्री, पोतराज, देऊळवाले, डोंबारी असे अनेक क्षेत्रातील कलावंत यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नवनियुक्त सदस्य ब्रह्मदेव केंगार यांनी केले होते. या यावेळी ही योजना प्रभावीपणे व सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी नवनियुक्त सदस्य ब्रह्मदेव केंगार व सागर महाराज बोराटे यांची मा. आ. राम सातपुते व पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी नियुक्ती केल्याने ते ही योजना प्रभावीपणे पोहोचवावी, या योजनेसाठी लागणारे कागदपत्र व अटी याची माहिती देण्यात आली. आत्तापर्यंत 10 प्रस्ताव मंजूर केले असून नवीन 30 प्रस्ताव दाखल केले आहेत.

या योजनेमध्ये पाच हजार रुपये मासिक मानधन मिळते. त्यामुळे आयुष्यभर लोककला केलेल्या कलावंतांना म्हातारपणी या योजनेचा आधार वाटतो. त्यामुळे ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी काढले.

यावेळी संजय देशमुख मंडळाध्यक्ष नातेपुते, सागर महाराज बोराटे, काकासाहेब जाधव ओबीसी मंडळ अध्यक्ष अकलूज, देविदास पाटील नातेपुते मंडळ उपाध्यक्ष भाजपा आदी उपस्थित होते. यावेळी काकासाहेब जाधव व सागर महाराज बोराटे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ब्रह्मदेव केंगार महाराज यांनी केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom